तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
विरुर स्टेशन,दि-27 डिसेंबर:- विरुर स्टेशनच्या हद्दीतून लूना आणि ऑटोमध्ये अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघात ऑटोमधील प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले आहे.
फिर्यादी विनोद सूधाकर खनके वय 32 वर्ष, रा.टेबूंरवाही, ता. राजुरा हा वरूर गावाचे जवळ गेल्यावर 1 वाजताच्या सुमारास एक ऑटो अपेक्सलरा डिलक्स एम.एच 34 डी-8108 ही राजूरा ते वरूर कडे येत होती त्यामध्ये पॅसेजंर बसून होते. त्यावेळी भिमराव सिनू सिडाम रा. गोट्टा ता. राजुरा हे टीव्हीएस एक्स एल 100 एम एच 34 सी ए 6541 लूना विरूध्द दिशेने वरूर ते राजूरा कडे चालवत जात होते. वरूर जवळ रस्त्यात खड्डा असल्याने वरूर कडून येनारे वाहन लूना च्या चालकाने आपले बाजु सोडून विरुध्द बाजूने चालवून सामोरून येणारा ऑटोला धडक्क मारून अपघात घडवून आणला त्यामध्ये
ऑटो पलटी होवून त्यामध्ये प्रवास प्रवासी जखमी झाले आहे. अश्या फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या लुना चालक भिमराव सिनू सिडाम यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन विरुर येथे 326/ 2022 कलम 279, 337, 338 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, ठाणेदार पो.स्टे विरूर यांनी घटनस्थळी जाऊन अपघाताची माहिती जाणून घेतली. या घटनेचा पुढील तपास मनापोशी सविता गोणेलवा करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348