मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या नागपुर येतील निवासस्थानी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल सदिच्छा भेंट घेतली.
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सदिच्छ भेंटीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. आगामी होऊ घातलेल्या निवडणुका, भाजपाच्या संघटनात्मक व इतर विषयांवर तब्बल दीड तास चर्चा केली, ह्यावेळी राजेंनी चंद्रशेखरजी बावनकुळे यांना अहेरी येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी लवकरच अहेरी येण्याचे मान्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

