Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोरोनाबाधित असलेल्या आत्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत महिला डॉक्टरवर केला प्राणघातक हल्ला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 30, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोरोनाबाधित असलेल्या आत्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत महिला डॉक्टरवर केला प्राणघातक हल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- काही दिवसा अगोदर येथील प्रसिद्ध डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हात एकच खळबळ माजली होती. त्यात आता एक नवी माहिती समोर येत आहे. कोरोना बाधित असलेल्या आत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत दिवंगत डॉ. वसंत पवार यांच्या कन्या असलेल्या डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातून तिघा संशयितांना अटक केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दि. १३ डिसेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास हल्लेखोरांनी गोवर्धन शिवारात पवार फार्मस‌्च्या प्रवेशद्वारावर डॉ. प्राची पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.

अभिषेक दीपक शिंदे वय १९, रा. कलानगर, गंगापूर रोड, धनंजय अजय भवरे वय १९, रा. ता. देवळा, सध्या रा. दिंडोरी रोड, पवन रमेश सोनवणे वय २२, रा. लोहोणेर, ता. सटाणा, सध्या रा. सातपूर कॉलनी अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. डॉ. प्राची पवार यांच्यावर गोवर्धन शिवारात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर संशयित पसार झाले होते. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे-केदार, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, कविता फडतरे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी १० पोलिस अधिकारी व ४० अंमलदारांची दहा पथके तयार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहिती, संशयितांच्या वर्णनाच्या आधारे तिघा संशयितांना पकडले आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

वाहनावरून पडल्याने पोलिसांच्या जाळ्यात
हल्लेखाेरांनी डॉ. पवार यांच्यावर हल्ला केल्यानंतर शहराच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले होते. त्याचप्रमाणे शहरात येत असताना तिघांचा अपघात झाल्याने ते जखमी झाल्याचेही पोलिसांना प्राथमिक तपासात समजले. त्यानुसार पोलिसांनी त्यादृष्टीने तपासास सुरुवात केली. संशयितांचे वर्णन, त्यांचे कपडे, वाहनावरून शोध सुरू ठेवला. तसेच तिघांनी दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेतल्याचे पोलिसांना समजताच त्यानुसार पोलिसांनी तिघा संशयितांना पकडले.

संशयित अभिषेक शिंदे याची आत्या कोरोना बाधित झाल्याने तिच्यावर पंडित कॉलनी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान १२ मे २०२१ रोजी मृत्यू झाला होता. याचा राग अभिषेकला होता. त्यामुळे डॉ. पवार यांना अद्दल घडवण्याच्या हेतूने अभिषेकने हल्ल्याचा कट रचला होता. त्यासाठी त्याने धनंजय व पवन या दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची सुपारी दिली. अभिषेकने भद्रकाली परिसरातून धारदार चॉपर खरेदी केला होता, असे तपासात उघड झाल्याचे अधीक्षक उमाप यांनी सांगितले.

Previous Post

जळगाव जिल्हातील वडजी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारा विरोधात : काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Next Post

शेतकर्यांच्या प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात साधी चर्चा नाही, येथे पिकनिक अधिवेशन करिता आलो काय?: आ. अमोल मिटकरी

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शेतकर्यांच्या प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात साधी चर्चा नाही, येथे पिकनिक अधिवेशन करिता आलो काय?: आ. अमोल मिटकरी

शेतकर्यांच्या प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात साधी चर्चा नाही, येथे पिकनिक अधिवेशन करिता आलो काय?: आ. अमोल मिटकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In