तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 30 डिसेंबर रोजी जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी तर्फे 2 जानेवारी ला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेच्या नियोजनाबाबत चेतन हॉटेल राजुरा येथे राजुरा ग्रामीण व शहर ची व्यापक बैठक संपन्न झाली, यामध्ये राजुरा ग्रामीणचे 87 बूथ पैकी 60 बूथ एकूण 35 गावातील प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीला व्यापक प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित सर्व गावातील सर्व प्रतिनिधींचे जिल्हा कार्यकारणी तर्फे आभार मानण्यात आले.
यावेळी या सभेच्या यशस्वितेसाठी आपण सर्व अशाच प्रकारे सहकार्य करावे आणि 02 जानेवारी ला होणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सभेला सकाळी 10 वाजता आपल्या आपल्या गावातून चंद्रपूर येथे सभेच्या नियोजित ठिकाणी,आंबेडकर चौकाजवळ, दर्गा जवळील मैदान येथे उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी एड. अभियंता प्रशांत विजयराव घरोटे यांनी केले.

