प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- प्रेम, करुणा आणि आनंद वाटण्याचा सण म्हणजे प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस अर्थात नाताळ चा उत्सव २५ डिसेंबर रोजी ओंजळ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चिमुकल्यांन बरोबर मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
जसं ख्रिसमस मध्ये सांताक्लॉज स्वतःच्या पिशवीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट चॉकलेट व आनंद भरून वर्षाचा शेवट तसेच नवीन वर्षाची सुरुवात करतो त्याच पद्धतीचं काम ओंजळ बहुउद्देशीय संस्था मधील प्रत्येक कार्यकर्ता मुलांच्या आयुष्यातील छोटासा न छोटासा सांता बनून त्यांच्या सर्व अपेक्षांची पूर्तते करण्याचं काम सतत वर्षभर करत आहे.

ओंजळ बहुउद्देशीय संस्था गेल्या आठ वर्षापासून कार्यरत असून मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाकरिता प्रगतिशील आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे परीक्षण करणे व व त्यांना सतत मार्गदर्शन करण्याचं काम प्राजक्ता मुते या करत असतात. या चिमुकल्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम व त्यांच्यासाठी मोकळा असलेल्या आकाशामध्ये गगनभरारी घेण्याचा सामर्थ्य, प्रोत्साहन देण्यासाठी संस्था कार्यरत असते. अशाप्रकारे संस्था मुलांचं सर्वांगीण विकास करून समाजामध्ये एक चांगला नागरिक तयार करण्याच्या उद्देशाने संस्था सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348