पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
दिनांक ३१/ १२ / २०२२ रोजी रात्रौ ०८.०० वा चे सुमारास फिर्यादी नामे केदार राम कुंभार रा-कसबा पेठ, पुणे व त्यांचा मित्र यश पिंगळे असे अगरवाल सोसायटी कसबा पेठ पुणे चे गेटचे आतील बाजूस आपआपले मोबाईल फोनवर पबजी गेम खेळत बसलेले असताना त्या ठिकाणी आरोपी नामे अदित्य भुजबळ , पवन जाधव, आयान शेख हे दुचाकीवरुन फिर्यादी केदार कुंभार याच्या जवळ आले व त्याच्याशी विनाकारण भांडण काढुन तु रोहीतचा मित्र आहेस ना तुला खल्लासच करतो असे बोलुन कोयता फेकुन मारला तो त्याच्या डोक्यावर मानेवर व खांदयावर मारुन जखमी. त्याचेवेळी तेथे रोहीत दरेकर हा आला असता त्याने आरोपी अदित्य भुजबळ याला कोयता उचलुन पॅटचे आत खोचताना पाहीले असता तो त्याचेकडे जाऊन केदारला मारु नको असे बोलला असता आरोपी अदित्य भुजबळ याने आज तुझा मर्डरच करतो असे म्हणुन त्याचे पॅन्टचे आत खोचलेला कोयता जोरात फिरकुन रोहीत दरेकर याच्या डोक्यात मारुन जखमी केले तसेच आरोपी पवन जाधव व आयान शेख यांनी शिवीगाळ करुन धमकी दिली म्हणुन फरासखाना पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ०१/ २०२२ भा.दं.वि कलम ३०७,५०४, ५०६, ३४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५, आर्म अॅक्ट कलम ४. २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे १) पवन अशोक जाधव वय २१ वर्षे धंदा हेल्पर रा. ४४५. झांबरे चावडी. कसबा पेठ, पुणे २) आयान नासिर शेख वय १९ वर्षे रा. १३४४, सुर्या हॉस्पीटल जवळ, कसबा पेठ, पुणे ३) आदित्य रवी भुजबळ वय २२ वर्षे रा. १३२६ कसबा पेठ सुर्या हॉस्पीटलजवळ, पुणे याचा शोध सुरु असताना फरासखाना पोलिस स्टेशनचे हवालदार यांना गोपनीया बातमीदाराकरवी मिळालेल्या बातमीच्या आधारे शोध घेतला असता ते मिळुन आल्याने तात्काळ अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री संतोष शिंदे हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक सो. मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ पुणे, श्री. संदीप गिल, सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. सतिश गोवेकर सोो. यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद, सहा. पोलीस निरीक्षक, संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, गणेश दळवी, तुषार खडके, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, अजित शिंदे, शशिकांत ननावरे, किशोर शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

