पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
पुणे :- ३१ डिसेंबर, नववर्ष स्वागत व भिमा कोरेगाव येथे शौर्यदिनाच्या बंदोबस्ताचे निमीत मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत अवैध चंदयावर कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते. व.पो.नि. रामदास इंगवले, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी विचवड यांनी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून अवैध चंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. दिनांक ३१/१२/२०२२ रोजी दरोडा विरोधी पथकाकडील पोलीस शिपाई ब.नं. २९४७ विनोद वीर व पोलीस नाईक ब.नं. १०६२ गणेश हिंगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फतीने कुरुळी निघोजे रोडच्या डाव्या बाजुस दिक्षीका लॉजिस्टीक कंपनीच्या समोर मोकळ्या जागेमध्ये गुटख्याने भरलेला एक ट्रक उभा असुन त्या ठिकाणी काही इसम हे सदर ट्रकमधिल माल एका महिंद्रा पिकअप माडीमध्ये भरत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली. सदर कारवाई अनुशंगाने व.पो.नि. रामदास इंगवले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप-निरीक्षक मंगेश मांगे, सहाय्यक पो. फौजदार महेश खांडे, पोलीस हवालदार १०७२ नितीन लोखंडे, पोलीस नाईक १०६२ गणेश हिंगे, पोलीस नाईक १६७४ सागर शेडगे, पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर, पोलीस शिपाई २६४३ गणेश सोवत व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर यांचे पथक तयार करून सदर ठिकाणी छापा मारुन कारवाई करणेबाबत आदेश दिले.
सदर पथकाने कुरुळी निघोजे रोडच्या डाव्या बाजुस दिक्षीका लॉजिस्टीक कंपनीच्या समोर मोकळ्या जागेमध्ये मु.पो.कुरुळी गाव, ता खेड, जि. पुणे येथे जावुन दोन पंचासह छापा टाकून कारवाई केली असता आरोपी नामे १ राजु राम देवासी, वय २१ वर्षे रा पाटील नगर श्री राम सोसायटी, – चिखली, पुणे २. राकेश बीजराम देवासी, वय- १९ वर्षे रा चिखली, पुणे ३. दुधाराम बेहरराम देवासी, – वय २९ वर्षे रा सदर ४ श्रावण कुमार धनेशराम देवासी, वय २९ वर्षे रा सदर हे इराम नामे ५. गोकुळ मुरलीधर योगी, वय ३४ वर्ष रा मु.पो. अंबड, ता नाशिक, जि नाशिक यांचे Ashok leyland ट्रक मधुन एका महिंद्रा बोलोरो पिकअपमध्ये कुख्यात गुटखा विक्रेता नरेश देवासी, रा मोरे वस्ती, चिखली, पुणे याचे सांगणेवरुन त्याने विक्रीकरीता मागविलेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक / अपायकारक असा एकुण कि.रू. ४३,०३, २००/- चा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ विमल गुटखा पुरवठा करीत असताना मिळुन आले. सदर गुटखा जागीच जप्त करण्यात आला आहे. तसेच १०,००,००० रु किं था एका Ashok leyland ट्रक व
०५,००,००० रु कि चा एका महिंद्रा बोलोरो पिकअप असा एकूण ५८,०३,२०० /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरबाबत म्हाळुंगे पोलीस चौकी येथे पोलीस शिपाई विनोद वीर यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास दरोडा विरोधी पथक करीत आहे.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, गा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पद्माकर घनवट, सहा पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप-निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, विनोद वीर गणेश सावंत, सुमित देवकर सागर शेडगे, गोविंद सुपे राजेश कौशल्य व विक्रांत गायकवाड यांचे पथकाने केली आहे.