Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी घेतला हिंगणघाट व समुद्रपुर पंचायत समितीचा आढावा बैठक

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 6, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी घेतला हिंगणघाट व समुद्रपुर पंचायत समितीचा आढावा बैठक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.6:- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी हिंगणघाट व समुद्रपुर पंचायत समितीचा आढावा आज हिंगणघाट येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी पंचायत समिती मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्य स्थिती व प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विविध गावांना भेट देत विकास कामांची पाहणी केली.

यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीर सुरज गोहाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, संशोधन अधिकारी अपुर्व फिरके, हिंगणघाटचे गटविकास अधिकारी प्रशांत भोयर, समुद्रपुरचे रोशन कुमार दुबे उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मिशन ग्रामोदय योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी 5 ग्राम पंचायतींची निवड केली. त्यात हिंगणघाट येथील अल्लीपूर, वणी, जांगोणा, वाघोली, सावली (वाघ) तर समुद्रपूर येथील भोसा, बरबडी, पाठर, उब्दा, कानकाटी या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये शासनाच्या सर्व योजना कार्यान्वीत करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

जीपीडीपी योजनेंतर्गत आराखड्यामध्ये ग्रामोदय मिशन योजनेचा समावेश करुन आराखडे तयार करण्यात यावे. सदर आराखडे विहित मुदतीत ऑनलाईन करण्याबाबत निर्देश देण्यात आले. 15 व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीमधून मागील वर्षातील कामे मार्च पर्यत पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. रोजगार हमी योजनेंतर्गत अपूर्ण कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
शिक्षण विभागाचा आढावा घेतांना अध्ययन स्तरामध्ये भाषा आणि गणित विषयामध्ये 10 टक्के वाढ झाली असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत सॅम व मॅम योजनेचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती समुद्रपूरने कुढलाही निधी न वापरता विविध उपाययोजना करुन सॅम मधिल बालकांची सुधारणा केल्याने सीईओंनी कौतूक केले.

आरोग्य विभागाचा आढावा घेतांना गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढण्याचा आढावा घेण्यात आला. ही कामे मिशन मोडवर करण्याबाबत यावे कायाकल्प मध्ये ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम 50 टक्केच्या खाली आहेत तसेच ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम 50 टक्केच्यावर आहे त्यांनी 80 टक्केवर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. ग्राम पंचायतींच्या वसुलीचा देखील आढावा घेतला. वसुली वाढविण्याच्या सुचना त्यांनी केल्या. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची कामे 31 जानेवारी पर्यत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

गावांना भेटी व कामांची पाहणी
बैठकीनंतर श्री.घुगे यांनी ग्रामपंचायत वाघोली येथील बचतगटामार्फत सुरु असलेल्या बॅक् ऑफ बडोदा ग्राहक केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली. चांगल्या कामासाठी शिला पेले यांचे त्यांनी अभिनंदन केले. सुलोचना फुड प्रोसेसिंग प्रॉडक्ट, स्वरुप स्वयंम सहाय्यता गटामार्फत चालविल्या जात असलेल्या दुधडेअरीची पाहणी केली. अल्लीपुर येथील स्वयंम सहाय्यता गटामार्फत चालविल्या जात असलेल्या खुशी साडी सेंटर, अल्लीपूर येथे ग्रामपंचायतच्या वाचनालयास भेट दिली. येरणगाव, शेकापुरबाई येथे शाळा भेट व शैक्षणिक गुणवत्ता चाचणी घेतली व बांबर्डा येथील पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली.

Previous Post

अचानक लोक आली मला उचलून नेलं, तोंड दाबून घेऊन गेले, त्यांनी गाडी बदलली, माझ्या डोळ्याला पट्टी बांधली, सिन्नर येथे 10 वर्षाचा मुलाचे अपहरण.

Next Post

संगमनेर शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली, संगमनेर शहर विकासाचे मॉडेल ठरले आहे: आमदार बाळासाहेब थोरात

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली, संगमनेर शहर विकासाचे मॉडेल ठरले आहे: आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली, संगमनेर शहर विकासाचे मॉडेल ठरले आहे: आमदार बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In