प्रवीण जगताप हिंगणघाट प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.5 जाने:- स्थानीय जी बी एम एम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथील एसएससी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक किशोर उकेकर व डॉ. अनिस बेग यांच्या शैक्षणिक उपक्रम या संकल्पनेतून मार्गदर्शनात्मक कार्यशाळा ‘‘चला परिक्षेला’’ चे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेची सुरवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यापर्ण करून करण्यात आली. शाळेचे प्राचार्य जी. एम ढगे यांनी उपक्रमशील शिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शक राजकुमार तिरभाने सर यांना २०२१-२२ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार अरण्यात आला. उपप्राचार्य सुनील फुटाणे यांनी इंग्रजी मार्गदर्शक प्रादिप मोकदम तसेच पर्यवेक्षक कुरेशी यांनी गणित विषयाचे मार्गदर्शक अजय खंडाईत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.
राजकुमार तिरभाने सर यांनी मुलांना विज्ञान विषयाची तयारी कशी करवी, महत्वाचे प्रश्न कसे सोडवावे परीक्षकाला अपेक्षित उत्तर कस असतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. अजय खंडाईत यांनी गणित या विषयावर विद्यार्थ्यांना रोल प्ले च्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले व परीक्षेत वेळेच नियोजन कस कराव तसेच परीक्षेत गणित कशा प्रकारे सोडवावं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रदिप मोकदम यांनी इग्रजी विषया बद्दल मार्गदर्शन करतांना इग्रजीचा पेपर सोडवताना होणाऱ्या चुका तसेच इग्रजी या विषयाचा पेपर कसा सोडवावा याबद्दल माहिती दिली. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कार्यशाळे विषयी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये वर्ग १० वा (क) ची विद्यार्थिनी राखी राठोर हिच्या मते हि कार्यशाळा अत्यंत महत्वाची होती त्यामुळे बोर्ड पेपर कसा सोडवावा व उत्तम गुण कसे प्राप्त करावे याची एक जादुई किल्ली हातात लागली असून आम्ही नक्की चागले गुण मिळवू असा आत्मविश्वास तयार झाला आहे असे म्हटले व सर्व मार्गदर्शक यांचे तिने आभार मानले. विद्यार्थ्यांचे मनोगत व आनंदी चेहरे पाहून प्रमुख वक्ते तसेच शाळेचे सर्व शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या वतीने सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्याच्या अतुलनीय योगदानासाठी गौरंवीत करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन पवार यांनी केले तर कार्यशाळेचा शेवट डॉ. अनिस बेग यांनी सर्वांचे आभार मानून केला.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राखी राठोर, संचिता गायन, खूशी देशकर, सोनाली उके, भुमिका माने, पूजा यादव या विद्यार्थी समितीने तसेच शाळेतील जेष्ठ शिक्षक किशोर उकेकर, जाधव, बरडे, काटकर, पवार, व्यवसाय शिक्षक त्रिरत्न नागदेवे व सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले. या अप्रतिम शालेय उपक्रमाची सर्व स्तरावर चर्चा करण्यात येत आहे.