स्त्री शिक्षणाचा प्रसार झपाटयाने पण अत्याचारात वाढ: प्रा. डॉ.शरद विहीरकर
प्रवीण जगताप हिंगणघाट प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी स्त्रियांसाठी दार उघडे करून दिल्यावर स्त्री शिक्षणाचा प्रसार झपाटयाने झाला आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही सर्व क्षेत्रांमध्ये तिचे नेत्र दीपक प्रगती असूनही तिने यशाचे अनेक शिखरे पादाक्रांत केले तरी तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण मात्र कमी झाले नाही. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ.शरद विहीरकर यांनी काढले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आधार फाउंडेशन चे कार्यकारी अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत धार्मिक होते तर सत्कारमुर्ती श्री. मधुकर चाफले उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. पुढे बोलताना त्यांनी सत्कारमूर्तीच्या जीवन कार्याची ही माहिती दिली नोकरी करूनही समाजाप्रति कर्तव्य भावनेने कार्य करण्याचे व्यक्तिमत्व म्हणजे चाफले सर आहे असे गौरव उद्गार त्यांनी काढले व याप्रसंगी फाउंडेशनच्या वतीने त्यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले ती पुढेही समाजाप्रति कार्य करीत राहणे मला आवडेल व ते कार्य मी निरंतर करीत राहील अध्यक्षीय भाषणा तून लक्ष्मीकांत धार्मिक यांनी सावित्रीबाईंनी केलेल्या समाजिक कार्याची माहीती दिली व सत्कार मूर्ती यांना पुढील निरोगी, निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनिता गुंडे यांनी केले तर आभार श्री.श्याम निमट यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आधार फाउंडेशन सदस्य श्री. गिरीधर काचोळे, जगदीश वांदीले, सचिन येवले, सुरेश गुंडे, तुषार लांजेवार, माया चाफले, ज्योती धार्मिक, माधुरी विहीरकर, वैशाली लांजेवार, वीरश्री मुड़े आदी सदस्यांनी सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348