मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून अहेरी तालुका पोर्टल पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अहेरी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले आहे. यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जावेद अली, मधुकर गोंगले, श्रीनिवास बंडमवार, सुरेश मोतकूलवार, अन्सार अली, एजाज पठान, किशोर उसेंडी, राहुल गर्गम सह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी अहेरी उपजिल्हा जिल्हा रुगण्यात डॉ. उमाठे यांनी पत्रकाराना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि पत्रकार हा जगाचा आरसा असून प्रत्येक कार्यात सहभागी होतो. कोरोंना काळात जनतेनी कशापद्धतीने जीवन जगावे काय केले पाहिजे. याबद्दल दिवस रात्र एक करून स्वतः जीवाची पर्वा न करता जनतेला मार्गदर्शन करीत होते. जर कुणी अडचणीत असो कि सुखा दुःकात पत्रकार हे नेहमी पुढे असतात. पत्रकार हा निपक्ष, निर्भीड असायला पाहिजे जनतेची आवाज म्हणजे पत्रकार होय असे डाँ उमाठे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जावेद अली यांनीही आपल्या भाषणात बोलताना म्हणाले कि शेवटच्या गावापरेंत जे जे प्रश्न असतील ते आपण आपली जवाबदारी समजून प्रश्न उचलून धरावे व निर्भीड पणे काम करीत राहावे हिच खरी पत्रकारिता होय असे बोलताना म्हणाले. यावेळी अहेरी ग्रामीण पत्रकार संघटनेचे पधाधिकारी व सदस्य उपस्थित होते.