विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहुरी:दि.7 जाने:- राहुरी येथे ख्रिस्ती आघाडीच्या वतीने ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा बदल सभा राहुरी फॅक्टरी येथे 7 जानेवारी ला दुपारी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसापासून ख्रिस्ती धर्मगुरू यांच्या वर आणि चर्चवर खूप मोठ्या प्रमाणत हल्ले होत आहेत. अनेक धर्मगुरू वरती खोटे गुन्हे देखील दाखल केले जात आहे. ख्रिस्ती विधी चालू असताना चर्च मध्ये वाद घालून ख्रिस्ती धर्मगुरूंचा छळ करण्यात येत आहे. यावर सरकारकडून आम्हाला योग्य ती मदत मिळावी व संरक्षण मिळवे यासाठी आज या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या ख्रिस्ती समाजाच्या सभेच्या अध्यक्षस्थानी पास्टर दीपक थोरात, उपाध्यक्ष पास्टर डेव्हिड ठोकळ, बिशप विश्वास वाघमारे, सेक्रेटरी पास्टर पीटर बनकर, उप सेक्रेटरी पा.अलीशा जोगदंड, सल्लागार अनिल भोसले सह इतर संघटनेचे अधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवर मंडळींनी आपल्या भाषणात म्हटले की, आज ख्रिस्ती समाज बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहे. भारतीय संविधानाने सर्व धर्माला समान मानून सर्वांना आपल्या धर्माचे आचरण आणि प्रचार प्रसार करण्याचे स्वतंत्र दिले. पण काही लोक जनबुजून लोकात जातीत तेढ निर्माण करून ख्रिस्ती चर्च आणि धर्मगुरू यांच्या वर हल्ले करत आहे. आता आम्ही अन्याय सहन करणार नाही. आम्ही या अन्याय विरोधात संवैधानिक मार्गाने रस्त्यावर येऊन विरोध करू. आम्हाला आमचे हक्क मिळाल्या शिवाय आता आम्ही मागे हटणार नाही.
यावेळी ख्रिस्ती सेवा समिती पा. बिपीन गायकवाड, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास त्रिभुवन, आरपीआय चे सुरेंद्रभाऊ थोरात, प्रियांका दुशिंग. तसेच महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याचे धर्मगुरू व अनेक ख्रिस्ती बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.