तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वरोरा:- येथे श्री संजीवनी बहुउद्देशिय संस्था आणि श्रीगुरूदेव सेवा महिला मंडळ व्दारा आयोजित वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यस्मरण सोहळ्या आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा या पुण्यस्मरण सोहळ्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अहिर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि उपस्थित नागरिकांना संबोधित केले.
यावेळी प्रामुख्याने देवराव भोंगळे, बाबा भागडे, करण देवतळे, सुरेश महाजन, प्रमोद महाराज देशमुख, रुपलालजी कावळे, एकनाथ महाराज गायत्री, प्रकाश महाराज वाघ, सुशिलराव वणवे यांच्यासह अन्य उपस्थित होते.