मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची मिनी बस उलटली असून 29 पैकी 13 प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे . अपघातानंतर जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वतावरून परतल्या नंतर माघारी परतत असताना गंगाद्वार जाणाऱ्या ठिकाणी उतारावरील बस उलटल्याने अपघात झाला.
नाशिक शहरात दर आठवड्यात एका बसचा अपघातसमोर येत आहे. सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नाशिकसह त्र्यंबकेश्वरला भाविक भेटी देत आहेत. अशातच बुलढाणा येथून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील ब्रम्हगिरीवरून जाऊन आलेल्या भाविकांनी बसमध्ये बसून प्रवास सुरु केला. ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी बस थेट नाल्यात उलटून होऊन समोरच्या झाडाला अडली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र काही भाविक जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.
त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या खासगी प्रवासी बसला अपघात झाला असून बस उलटल्याने 13 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. हे सर्व जण बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळलीआहे. त्र्यंबकेश्वर येथे आज दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याने 13 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जखमी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस उलटल्याचे बोलले जात आहे बसमध्ये एकूण 29 प्रवासी होते. त्यापैकी 13 जण जखमी असून प्रेमसिंग फापळ हे गंभीर जखमी आहेत. भाविकांनी भरलेली ही बस नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला अडकल्याने सुदैवाने जीवित हानी टळली आहे. हे सर्व जखमी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तो उतार धोकादायक होता…
त्र्यंबकेश्वरला वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. अशातच येथील गंगाद्वार आणि ब्रम्हगिरी या ओदनही ठिकाणी अनेकदा पर्यटक भेटी देत असतात. मात्र त्र्यंबकेश्वर गावातून निवृत्तीनाथ मंदिराकडे निघाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे संस्कृती हॉटेल नजरेस पडते. या ठिकाणी गंगाद्वारे आणि ब्रम्हगीरीकडेजाणारा रस्ता आहे. हे दोन्ही पर्यटनस्थळे पाहून आल्यानंतर तीव्र उतार असतो, या ठिकाणी अनेकदा वाहनांचा अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.