मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक शहरा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास मोठी जिवीतहानी होत असते. त्यामुळे काळजी पूर्वक सिलेंडरची कामे करावी लागतात. नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोटात आईसह तीन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिकरोडच्या नारायण बापू नगर परिसरात घडली आहे.
गॅस सिलेंडर हा आपल्या आयुष्यातील आवश्यक घटक बनला असला तरी अनेकदा सिलेंडर हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे काळजी घेणं खुप गरजेचं असतं अन्यथा गॅस गळती होऊन स्फोट होण्याची देखील भीती असते. या घटना उघडकीस आल्या आहेत, अशीच एक घटना नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात घडलीआहे. स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरावरील पत्रे उडाल्याने आईसह तीन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिकरोडच्या नारायणबापु नगर परिसरात घडली आहे. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या महिलेसह तिच्या मुलांना प्रथम बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर प्रथम उपचार करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड परिसरातील नारायण बापूनगर येथील लोखंडे मंगल कार्यालयासमोर पुंजाजी लोखंडे यांच्या मालकीची पत्र्याची चाळ आहे. या चाळीतील खोल्यांमध्ये अनेक भाडेकरी राहतात होते.त्यात मोलमजुरी करणाऱ्या भाडेकरांचा समावेश आहे. आज सकाळी या चाळीतील एका घरामध्ये सुगंधा सोळंकी ही महिला घरकामात मग्न होती. लहान मुलांना शाळेत जायचे असल्याने चहा पाणी व जेवणाचा डबा करून देण्याच्या कामात व्यस्त असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे घरावरील पत्र उडाले आहे. सुगंधा सोळंकी या 50 टक्के भाजल्या असून त्यांचा मुलगा रुद्र 15 टक्के भाजला आहे. तर आर्यन व सूर्या ही दोन मुले पाच टक्के भाजले आहेत. लोखंडे चाळीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदत साठी घटनास्थळी धाव घेतली होती.
या स्फोटात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला व तिच्या मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी शिंगाडा तलाव येथे असलेल्या अग्निशमन दलास फोन द्वारे कळवली ही माहिती मिळताच अग्निशामंदलाचे गाडी घटनास्थळी दाखल झाली अग्निशामन दलाच्या पथकाने तातडीने मदत कार्य सुरू करत काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्याचबरोबर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी देखील या मदत कार्यात सहभाग नोंदवत जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली.