Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला पोलिस अंमलदारची गळफास घेऊन आत्महत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 10, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला पोलिस अंमलदारची गळफास घेऊन आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस अंमलदार अर्चना रोहिदास कासार रा. नवनाथनगर, बोल्हेगाव यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे संपूर्ण पोलिस विभागात एकच खळबळ माजली आहे. महिला पोलिस अंमलदार अर्चना रोहिदास कासार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी 8 जानेवारी सकाळी घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अर्चना कासार या नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. त्यांना शनिवारी रात्री ड्युटी होती. त्यांनी रात्रभर ड्यूटी केल्यावर त्या रविवारी सकाळी घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना त्यांचे नातेवाईक सागर शिवाजी सुद्रिक रा. भूतकरवाडी, सावेडी यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अर्चना कासार यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्या नंतर नातेवाईकांसह त्यांच्या मैत्रिणींनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. पोलिसात असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर त्या पोलिस सेवेत काही वर्षांपूर्वी भरती झाल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी पोलिस दलात चर्चा आहे.

तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कासार यांनी आत्महत्या कोणत्या कारणातून केली, यासंबंधी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला अद्याप दुजोरा मिळू शकला नाही. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आहे. आधी वडील गमावले आणि आता आई, अशी वेळ त्या मुलांवर आली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

माजिवडे प्रभाग समिती अपयशी ठरल्याने भाजपाने कार्यालयात उघडले नागरी समस्यांचे गाठोडे.

Next Post

हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने कोलगाव शिवारातील 350 हेक्टर शेतजमिनींचे वेकोलिव्दारा लवकरच अधिग्रहण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने कोलगाव शिवारातील 350 हेक्टर शेतजमिनींचे वेकोलिव्दारा लवकरच अधिग्रहण.

हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने कोलगाव शिवारातील 350 हेक्टर शेतजमिनींचे वेकोलिव्दारा लवकरच अधिग्रहण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In