🖊️आशिष अंबादे 🖊️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट, 06:- राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव उड्डाणपुलाजवळ हैदराबादकडे जाणार्या मालवाहूने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात ट्रकचे नुकसान झाले तर दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले. ही घटना आज शनिवार 6 रोजी सकाळी 11वाजताच्या सुमारास घडली. हरीश व्यंकटेशन वय 26 वर्ष असे जखमी चालकाचे नाव सरबजीतसिंग अजिबसिंग वय 46 वर्ष असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे. तो पंजाब राज्यातील विलाकामो नासगल येथील रहिवासी आहे.
ट्रक चालक सरबजीतसिंग अजिबसिंग हा जाम येथून हिंगणघाटमार्गे हैदराबाद येथे जाण्यास निघाला होता. शिवाजी मार्केट यार्ड जवळ उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला होता. त्यामुळे चालकाने कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाजी यार्ड जवळ एम. एच. 34 बी. जी. 7712 क्रमांकाचा ट्रक उभा केला. दरम्यान, के. ए. 59-0997 क्रमांकाच्या मालवाहू वाहनाचा चालक उभ्या ट्रकवर आदळला. यात मालवाहू वाहन चालकास गंभीर दुखापत झाली. तसेच ट्रक चालकाच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. पुढील कारवाई प्रभारी ठाणेदार प्रकाश पाटणकर, उपनिरीक्षक गिरीधर पेंदोर, जगदीश चव्हाण, दीपक मस्के, करीत आहे.