शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी होत आहे.
✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई :- पदवीधर निवडणुकीत चांगली चुरस बघायला मिळत आहे. काही स्थिकाणी राजकीय पक्षात आपसात वाद चावाट्यावर येत आहे. त्यात आज नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु आज शुभांगी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं चित्र स्पष्ट झालं आहे. नाशिकमध्ये आता सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील अशी थेट लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना ठाकरे गटात दोन गट पडल्याचं समोर आलं आहे. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. त्यामुळे शुभांगी पाटील यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना ठाकरे गटात दोन गट पडल्याचं समोर आलं आहे. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. सुभाष जंगले हे अहमदनगर जिल्ह्यातून येतात या जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. एक लाख मतदारांची नोंदणी केल्याचा दावा शुभांगी पाटील यांनी केला आहे, मात्र त्या खोट बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे, असं घोलप यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शुभांगी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठवल्यानं त्यांना आता अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. शुभांगी पाटील या देखील अपक्ष आहेत, परंतु त्यांना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.