✒️राज शिर्के, मुंबई ( पवई ) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई,18 जानेवारी:- नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता मेट्रो-दोन अ आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर आले. या दौऱ्यात मोदी दोन मेट्रो प्रकल्पांसह विविध प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यावेळी दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो-1 सेवा, तब्बल पावणे दोन तास बंद ठेवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता मेट्रो-दोन अ आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी ते 7 वाजून 30 मिनिटांपर्यंत ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.
हा कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील मेट्रो 7 वरील गुंदवली स्थानकावर होणार आहे. हे स्थानक मेट्रो 1 च्या पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकाच्याजवळ आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण मेट्रो मार्गिकाच बंद ठेवली जाणार आहे. याबाबत मेट्रो-1 प्रशासनाने सूचना देखील जारी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे होर्डिंग्स आणि बॅनर लावण्यात आले. दुसरीकडे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एका रथाचं लोकार्पण करण्यात आलंय. हा रथ मुंबईच्या गल्लोगल्ली फिरणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या प्रकल्पांची माहिती या रथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोनबंदी करण्यात आली आहे.

