युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात शिक्षक पदवीधर निवडणुकीत प्रचार सुरू झाला आहे. सर्वच उमेदवार जोमात प्रचार करत आहे त्यात नागपुर विभाग शिक्षक मतदार संघातून बसपाने निमा संजय रंगारी (मोहरकर) यांना उमेदवारी दिली असून सध्या त्या जनसंपर्क दौऱ्यावर निघालेल्या आहेत. आज त्यांनी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आजच्या जनसंपर्कची सुरुवात केली. यावेळी प्रसिद्ध शिक्षक कार्यकर्ते शामराव तिरपुडे यांचेशीही सविस्तर चर्चा झाली. यावेळी रंगारी मॅडम सोबत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव विजयकुमार डहाट, संजय रंगारी, सुरजभान चव्हाण, दयाशंकर कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बसपा च्या उमेदवार निमा रंगारी ह्यांना नागपुरातून प्रथम पसंतीचे जास्तीत जास्त मतदान कसे मिळेल यावर विशेष चर्चा करण्यात आली. नागपूर विभागातील मतदार संघात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आदि जिल्ह्यातील शिक्षक मतदारांचा समावेश होतो.
आतापर्यंत या मतदारसंघातून बहुजनांची कत्तल करणाऱ्या संघ भाजपाचे प्रतिनिधी निवडून जायचे, आता बहुजन समाजाच्या हितरक्षणासाठी बसपा ने निमा रंगारी मोहरकर ह्या बहुजन समाजातील संविधान रक्षक उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी व परिवर्तनवादी विचाराच्या शिक्षकांनी निमा रंगारी यांना आपल्या पहिल्या पसंतीची मते द्यावी असे आवाहन बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

