सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दिनांक 21 जानेवारी ला विसापूर ते चंद्रपूर ला शिक्षणा करिता जाणे येणे करण्याऱ्या काही विध्यार्थ्यानी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांना वेडेवर कुठली बस विसापूर मध्ये न येत असल्याने विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, 5 वाजताची बस 6.30 पर्यंत येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचा शिक्षणा मध्ये खोळंबा होत आहे. या सर्व गोष्टींमुळे विध्यार्थी खूप त्रासून गेलेले होते व काही नवीन बस सुरु करण्याची अत्यंत गरज आहे अशी माहिती दिली.
विध्यार्थी रापम च्या बस सेवेमुळे खूप त्रस्त झालेले आहे हे समजताच संदीप पोडे यांनी सर्व विध्यार्थ्यांनसह सुधीर मुनगंटीवार (मस्त्यव्यवसाय, वन व संस्कृतीक मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांचा कार्यलयात विदर्थ्यांसह जाऊन समस्या सांगितल्या विध्यार्थी यांना होत असलेला त्रास सविस्तर सांगितलं व मागणी बाबत निवेदन दिले. निवेदन देताचा तात्काळ कार्यलयातील सहायकांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन उचित कारवाही करण्यात सांगितले. आणि सहायकानी लवकरच बस सेवा सुरळीत सुरु होईल असे देखील आश्वासन दिले. व विध्यार्थी बस सेवेमुळे त्रास सहन करणार नाही असे सांगितले.