Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नागपुरकरांनो सावधान तुमच्या गाडीची चालान फाटली असेल तर, गाडी होणार आता जप्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
नागपुरकरांनो सावधान तुमच्या गाडीची चालान फाटली असेल तर, गाडी होणार आता जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपुरकरांनो तुमच्या दुचाकी चारचाकी गाडीची चालान फाटली असेल तर तुमची गाडी आता जप्त होऊ शकते. ज्यांच्या गाडीची चालान थकीत आहे अशा गाडी धारकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्याचा आदेश पोलिस आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे आता अशा थकीत चालान धारकाचे धागे दकावले आहे.

2022 या वर्षात वाहतूक पोलिसांनी एकूण 9 लाख 73 हजार 939 वाहन धारकांवर वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे चालान दिले होते. यातील केवळ 2 लाख 8 हजार 709 वाहन धारकांनीच चालानच्या दंडाची रक्कम भरली. पण उर्वरित इतर 7 लाख 65 हजार 230 गाडी धारकांनी चालानच्या दंडाची ही रक्कम भरलेली नाही. त्यामुळे या वाहनांवर जप्तीची तलवार चालण्याचे संकेत मिळत आहे.

शहरात वाहतूक करीत असताना अनेकदा सिग्नल तोडणे, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे अशा अनेक नियम मोडण्याचे चालान येत असते. अनेकदा ते चालान शंभर रुपयावर असल्याने ते भरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते. मात्र तसे करीत असाल तर खबरदार. आता दुचाकी, कार किंवा इतर वाहनांवर ई चालान थकीत असेल तर नागपूर पोलीस तुमची वाहने जप्त करणार आहे. 500 रुपयांवर ‘ई चालान थकीत असलेल्या वाहनांना जप्त करण्याची मोहीम नागपूर पोलिसांनी सुरू केली आहे.

शहरात वाहतूक व्यवस्था ही मोठी समस्या आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस कार्यरत असतात. मात्र, शहराचा आवाका बघता त्यासाठी लागणारे मनुष्यबळ बरेच कमी पडते. त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतुकीचे मोठ्या प्रमाणात सर्व्हिलन्स करण्यात येते. असे होत असतानाही बरेच नागरिक वाहतुकीचे नियम मोडून वाहतूक करताना दिसून येतात.

अशा नागरिकांवर आवर घालण्यासाठी पोलिसांकडून ‘ई-चालान’ पद्धत सुरू केली आहे. त्यातून शहरातील अनेक नागरिकांवर ‘ई-चालान’अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी बहुतांशी नागरिकांनी चालान भरलेले नाही. त्यामुळे आता अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी थकीत ई चालान भरण्याचे आवाहन नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. याशिवाय नागपुरातील ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता फॅन्सी नंबर प्लेट, रॉंग साईड ड्रायव्हिंग, विना हेल्मेट, ट्रीपल सिट आणि सिटबेल्ट न लावणाऱ्यांवरही नागपूर पोलिस कारवाई करणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांसोबतंच स्थानिक पोलीस स्टेशनला ‘ई चालान मशिन’ देण्यात आली आहे.

Previous Post

‘गांधी गोडसे’चित्रपटाचा वाद पेटणार! काळे झेंडे दाखवत बंद पाडला कार्यक्रम.

Next Post

वागळे, उथळसर, कळवा विभागातून एकूण ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वागळे, उथळसर, कळवा विभागातून एकूण ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई.

वागळे, उथळसर, कळवा विभागातून एकूण ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In