जय अड्डाकसा नवयुवक क्रीडा मंडळ कडून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील झारेवाडा येथे जय अड्डाकसा नवयुवक क्रिडा मंडळाकडून आयोजित स्टॅम्पर बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला. या उदघाटनीय समारंभाला अध्यक्ष म्हणून कंत्राटदार प्रणय खुणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, तोडसा ग्रा.प.सदस्य नंदू नरोटे, गुरुपल्ली ग्रा.प.सदस्य अजय मडावी, पोलीस पाटील रैनूजी नरोटे, सुधाकर नरोटे, कना नरोटे, लुलाजी नरोटे, वंजाजी तिम्मा, लहुजी झोडे, माजी प.स.सदस्य रमेश तोरे, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख, विनोद कोवाशी, अजय कोवाशी, भीमराव गावडे, दिनेश मट्टामी, गोमजी नरोटे, सीताराम कातवो, नितेश तिम्मा, राकेश नरोटे, सह आविस पदाधिकारी होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उदघाटनीय भाषणातून क्रिकेट खेळाविषयी उपस्थित खेळाडूंना व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार गायत्री देवी कंट्रक्शन कंपनी गडचिरोली कडून तर द्वितीय पुरस्कार स्व.लहुजी पाटील खुणे स्व.विश्वेश्वर पाटील खुणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गायत्री देवी कंट्रक्शन कंपनी गडचिरोली कडून आणि तृतीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून चतुर्थ पुरस्कार मंडळाकडून ठेवण्यात आले. या उदघाटनीय समारंभाचे संचालन व आभार माजी पं.स.सदस्य रमेश तोरे यांनी मानले.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.