युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कळमेश्वर:- पासून 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या धापेवाडा येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद कळमेश्वर तालुका तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही तिळगुळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. त्याचप्रमाणे विद्येची देवता मातोश्री सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीषजी भिवगडे तर प्रमुख अतिथी कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष दयालजी कांबळे वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य मनोहरजी धनगरे, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य बाबा दुपारे, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस अरुणभाऊ वाहने, पत्रकार युवराजजी मेश्राम हे होते.
या कार्यक्रम प्रारंभी महिला शिक्षणाचा पाया असणारी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोस पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी स्वागत गीत शिल्पाताई बुरडे, निर्मलाताई माहुलकर, पुष्पाताई अटॅळकर यांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी विद्येची देवता मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर प्रकाश टाकण्यात आला. जुन्या अनिष्ट रुढी, परंपराला मुठ माती देऊन विज्ञानवादाकडे चालण्याची दिशा प्रमुख अतिथींनी दिली. विधवा महिलांना सुद्धा समानतेची वागणूक या संक्रातीच्या कार्यक्रमांमध्ये दिली पाहिजे. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे पुढील वर्षी पण सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण मोठ्या थाटात साजरी करणार आहोत. महिलांचा मेळावाच या ठिकाणी घेऊन महिलांचा सत्कार सुद्धा याप्रसंगी आपण करणार आहोत. अशी ग्वाही विदर्भशाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस अरुण भाऊ वाहने यांनी केली.या कार्यक्रमाचे संचालन अरुणभाऊ वाहने यांनी तर आभार प्रदर्शन महिला प्रतिनिधी शिल्पाताई बुरडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीते करता विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी गावंडे, महिला प्रतिनिधी निर्मलाताई माहुलकर, पुष्पाताई अटारकर व शिल्पाताई बूरडे यांनी अथक परिश्रम घेतले.