Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मतदार नोंदणी व जनजागृती मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांचा सन्मान.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 27, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मतदार नोंदणी व जनजागृती मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांचा सन्मान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- मतदार नोंदणी प्रक्रिया व मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोकण विभागातून ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेतर्फे गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या, दि. २५ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात हा गौरव करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. २५ जानेवारी, २०२३ रोजी १३ वा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, सकाळी ११ वाजता श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या चर्चगेट येथील पाटकर सभागृहात राज्यस्तरीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये मागील वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्याने केलेली उल्लेखनिय कामगिरी

•दि. ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादीमध्ये ६१३४९५५ एवढे मतदार होते. दि. ०५ जानेवारी २०२३ रोजी मतदार नोंदणीमध्ये ७९५६२ ने मतदारांच्या संख्येत वाढ होऊन मतदारांची संख्या ६२१४५१७ इतकी मतदार नोंदणी करण्यात आली.
•दि. ०९ नोव्हेंबर २०२२ ते दि. ०८ डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण १७३८८ एवढी १७+ मतदारांची नोंदणी करण्यात आली.
•विशेष संक्षिप्त कार्यक्रम २०२३ दरम्यान १७+ भावी युवा मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांच्या नोंदणीमध्ये १९३९४ इतकी वाढ झाली.
•ठाणे जिल्ह्यामध्ये असंरक्षित आदिवासी गटातील मतदार हे दुर्गम भागामध्ये पाड्यामध्ये रहिवास करत असतात. त्यामुळे अशा गटातील मतदारांची नोंदणी ही आव्हानात्मक असताना देखील ४३३१ इतक्या मतदारांची नोंदणी करण्यात आली.

•ठाणे जिल्ह्यामध्ये महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला मतदारांच्या संख्येमध्ये ४०२२६ ने वाढ होऊन जिल्ह्याचा लिंग गुणोत्तर प्रमाण (जेंडर रेशो) ८४३ वरून ८४५ एवढा झाला.
•ठाणे जिल्हा तृतीयपंथी मतदार नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकावर असून दि. ०९ नोव्हेंबर २०२२ पासून ते दि. ०५ जानेवारी २०२३ रोजीपर्यंत तृतीयपंथी मतदारांची २२५ नी वाढ होऊन १०७८ एवढी नोंदणी झाली आहे.
•मतदार नोंदणीमध्ये देह विक्री करणाऱ्या महिलांची ओळख गुप्त ठेवून १२४०१ एवढी मतदार नोंदणी झाली.
•बेघर मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून १६० इतकी बेघर मतदारांची नोंदणी करण्यात आली.
•ठाणे जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान दिव्यांग मतदारांच्या नोंदणी मध्ये एकूण १०४५ ने वाढ होऊन दिव्यांग मतदारांची संख्या ही ३२१३२ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात सर्व घटकांच्या मतदार नोंदणीमध्ये जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत कोकण विभागातून ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीम. अर्चना कदम, यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

Previous Post

‘हात से हात जोडो’ अभियान व्यापक करा: आमदार सुभाष धोटे.

Next Post

भारतीय जनता पार्टी मिरा भाईंदर जिल्हा कार्यालय मिरा रोड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भारतीय जनता पार्टी मिरा भाईंदर जिल्हा कार्यालय मिरा रोड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

भारतीय जनता पार्टी मिरा भाईंदर जिल्हा कार्यालय मिरा रोड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In