Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मिरा भाईंदर पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने गौरव.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मिरा भाईंदर पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने गौरव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हा सन्मान फक्त माझा नसून महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिकांचा आहे: आयुक्त दिलीप ढोले

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
989225040

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- दिनांक 28 जानेवारी रोजी रविंद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांना सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले.

“समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेवर आधारित सकाळ सन्मान हा सोहळा रविंद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. जनमाणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्यांचा ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव केला जातो. मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विकासकामे पूर्ण जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मा. आयुक्त यांनी केला. मा. आयुक्त यांच्या काळात महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, स्केटिंग रिंग, तरण तलाव, शहरातील नागरिकांसाठी भव्य असे मेडिटेशन सेंटर व धम्म सम्राट अशोक बुद्धविहार या वास्तूंचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालय इमारत बांधकाम, प्रशासकीय भवन इमारत, तानाजी मालुसरे मराठा भवन, महाराष्ट्रतील सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इमारत, हरिवंश राय बच्चन हिंदी भाषा भवन इमारत या वास्तूंचे भूमिपूजन करण्यात आले असून ही विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्व. प्रमोद महाजन कलादालन यासारख्या वास्तूंचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते हे सिमेंट काँक्रिटने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उद्यानांचे शहर ही वेगळीच ओळख निर्माण करून देण्याकरिता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व उद्याने ही नागरिकांसाठी खुली करून त्याची योग्य ती निगा राखण्याचे कार्य सुरू आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध अभियानात राज्यस्तरावर तसेच देशपातळीवर विविध प्रकारचे मानांकन प्राप्त केले आहेत. यामध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान अंतर्गत तृतीय पारितोषिक, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्यस्तरावर भूमी या थिमॅटिक भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार, इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका महाराष्‍ट्रात 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटात प्रथम क्रमांकाचे मानांकन, सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज या राष्ट्रीय अभियानामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेला देशस्तरावर 3 रे तर राज्यस्तरावर प्रथम मानांकन, स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेला 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटात राष्ट्रपातळीवर तृतीय तसेच राज्यपातळीवर प्रथम क्रमांकाने मानांकन प्राप्त झाले आहे.

शहर सौंदर्यीकरणावर भर देत मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बहुतांश रस्त्यांच्या भिंतींवर, उड्डाणपुलाखाली विविध प्रकारची भित्तीचित्र साकारण्यात आली आहेत. त्याचबरोबर मल:निसारण केंद्रांच्या भिंतीवर देखील विविध प्रकारची भित्तिचित्र साकारण्यात आली आहेत. शहरातील दुभाजकांवर विविध प्रकारची फुलझाडे लावून शहर सौंदर्यीकरणाचे काम शहरात सुरू आहे. त्याचबरोबर शहरात स्वच्छतेचे कार्य नियमितरित्या सुरू आहे. महानगरपालिका शाळांचा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका शाळेतील मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमातील एकूण 72 वर्ग हे डिजिटल स्वरूपात सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे महानगर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झालेली आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन महानगर पालिका मा. आयुक्त यांच्या अध्यक्षते खाली शहरात “वॉक विथ कमिशनर” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या सर्व कामांची दखल घेत 28 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांना सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मान सोहळ्यानंतर सकाळ सन्मान 2023 हा फक्त माझा सन्मान नसून माझे सहकारी, अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिकांचा आहे असे आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी सांगितले व महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिकांचे अभिनंदन करून त्यांचे आभार व्यक्त केले.

Previous Post

सोमवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी राहणार बंद.

Next Post

चंदननगर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, विश्रांतवाडी पो स्टे कडील मोक्याचे गुन्हयात तसेच इतर पोलीस स्टेशन कडील वेगवगळया ०४ गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंदननगर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, विश्रांतवाडी पो स्टे कडील मोक्याचे गुन्हयात तसेच इतर पोलीस स्टेशन कडील वेगवगळया ०४ गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

चंदननगर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, विश्रांतवाडी पो स्टे कडील मोक्याचे गुन्हयात तसेच इतर पोलीस स्टेशन कडील वेगवगळया ०४ गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In