Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा सावंगी येथे सुरू होती नकली दारू बनवण्याची कंपनी, पोलिसांनीअपार्टमेंटवर छापा घालून केली धडक कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 29, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा सावंगी येथे सुरू होती नकली दारू बनवण्याची कंपनी, पोलिसांनीअपार्टमेंटवर छापा घालून केली धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्हात संपूर्ण दारू बंदी असताना ही मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी होत असल्याचे प्रकार नेहमी समोर येत असतात. त्यात आता तर नकली दारू बनवण्याची कंपनी समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.

वर्धा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सावंगी येथील एका अपार्टमेंटवर छापा घालून नकली दारू तयार करणाऱ्या कंपनीला उघडकीस आणले. तेथून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कंपनीच्या रिकाम्या बॉटल्स, केमिकल, झाकण, सील मशीन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. मोठा साठा घटनास्थळावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सावंगी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या चिंतामणी अपार्टमेंटमध्ये नकली दारू बनविणारी कंपनी कार्यरत होती. माहिती पोलीस अधीक्षक यांना याबाबतची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्या आधारावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वातील क्राईम इंटेलिजन्स टीमने शनिवारी दुपारी छापा घातला. व चिंतामणी अपार्टमेंट येथे एका फ्लॅटमध्ये नकली दारू बनविण्याचे काम सुरू होते. पोलीस आल्याचे लक्षात येताच दारूनिर्मिती करणाऱ्यांनी घटनास्थळा वरून पळ काढला. तेथे वेगवेगळ्या नामवंत कंपनीच्या खाली बॉटल्स पोलिसांना आढळल्या. फ्लॅटमध्ये तयार करण्यात येणारी नकली दारू या बॉटल्समध्ये भरून त्याची पॅकिंग केली जायची. त्याकरिता लागणारी सामुग्री येथे होती. पोलिसांनी दारू बनविण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य, रिकाम्या बॉटल्स, झाकण, केमिकल, पॅकिंग मशीन, चाकू व इतर काही वस्तू ताब्यात घेतल्या. विशेष म्हणजे याच अपार्टमेंटच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये नकली दारू बॅगमध्ये पॅक करून विक्रीकरिता पाठविण्याचे काम चालत होते. त्याही ठिकाणावर मोठ्या प्रमाणात नकली दारूचा साठा पोलिसांना आढळला. या नकली दारू प्रकरणाशी जुडलेल्या व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे. छापा घातल्यानंतर कारवाई पूर्ण होईपर्यंत पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे घटनास्थळावर उपस्थित होते. भगत नामक व्यक्ती हा कारखाना चालवीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपी विरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळावर सावंगीचे ठाणेदार धनाजी जळक, इंटेलिजन्स चमूचे
पोलीस उपनिरीक्षक कापडे, सायबर क्राईम विभागाचे दिनेश बोथकर,अनुप कावळे व अन्य कर्मचारी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी रामनगर परिसरात छापा घालून पोलिसांनी खूला बियर बार उघडकीस आणला. शनिवारी ही दुसरी मोठी कारवाई करीत दारुविक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी मोर्चा उघडल्याचे दाखवून दिले. पोलिसांच्या या छाप्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नकली दारूची निर्मिती व विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Previous Post

आनंद आश्रमात ‘प्रायव्हेट कंपनी’ सुरू झाली का ? स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी मिंदे गटाकडून अडवणुकीचा प्रकार लांचनास्पद.

Next Post

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग.

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला पंतप्रधानांच्या 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभाग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In