✒️उषा कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार सांगली संस्थेतर्फे बौद्ध वधू-वर मंगलम सूचक पालक परिचय स्नेह मेळाव्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. यावेळी 68 विवाह योग्य वर आणि वधू ची विवाह नोदणी या मिळाव्यात झाली.

बौद्ध समाजाच्या वधू-वरांसाठी पालक परिचय मेळावा घेण्यात आला असून, या मेळाव्यात बौद्ध धम्म संस्कार सांगली संस्थेच्या प्रमुख पदाधिकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. विवाह इच्छुकांना रेशीमगाठ जुळविणे सोपे जावे, तसेच मेळाव्यात पालकांचा परिचय व्हावा म्हणून संस्थेतर्फे सतत पुढाकार घेतला जातो.