देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
9822917104
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आई महालक्ष्मी महिला अर्बन क्रेडिट को-आप सोसायटी लिमिटेड नागपूर जिल्हा या संस्थेच्या वतीने “हळदी कुंकू” कार्यक्रमाचे आयोजन सुरजनगर रायपूर, हिंगणा येथे करण्यात आले. या आयोजित कार्यक्रमात महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दिपावली संदिप कोहाड यांनी उपस्थित महिलांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. बचतीची गुरुकिल्ली ही महिलांच्या हातात असून संकट काळात त्यांचे योगदान फार मोलाचे ठरते. बचतीची संकल्पना महिलाच्या दृष्टीने कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिलांनी उख्यान्याचा आनंद लुटला. संस्थेच्या वतीने उपस्थित महिलांना तिळगुळ, वाण व संस्थेच्या प्रकाशित दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. संस्थेचे व्यवस्थापक भास्कर धार्मिक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. महिलांनी बचत गट स्थापन करून आर्थिक विकास कसा साध्य करता येईल या विषयीचे मार्गदर्शन केले. संस्थेचे हितचिंतक विठ्ठलराव कोहाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष उषा धार्मिक, संचालक मंगला अड्याळकर, रजनी धार्मिक, सुनिता लारोकर, लता धार्मिक, मालाबाई कोहाड, विशाखा कोहाड, कर्मचारी माधुरी धार्मिक, मेघा धार्मिक नेहा हिरुरकर, दत्तात्रय अड्याळकर, पायल धार्मिक व भुतेश्वर धार्मिक यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविल्याने संस्थेच्या वतीने उपस्थित महिला वर्गाचे आभार व्यवस्थापक भास्कर धार्मिक यांनी मानले.