✒️ पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
मोबा. न. 7020794626
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- गंभीर गुन्ह्यात सुमारे सहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे येथील डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमा नुसार अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सहा वर्षे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. सन्मान बाबासाहेब मापारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणेचे पोलीस आयुक्त यांच्या सूचनेनुसार पाहिजे व फरारी आरोपींची विशेष शोध मोहीम राबवत असताना डेक्कन पोलीस ठाणे, गु.र.क्र. 42/ 2016, भा .दं. वि. 420, 406, 506(2), 192, 120ब, 34 अन्वये मधील गुन्ह्यात मागील सहा वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नाव सन्मान बाबासाहेब मापारे हा आज एका ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याबाबत खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर वपोनि, डेक्कन पोलीस ठाणे यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपीच्या शोधात रवाना झाले. यावेळी सहा वर्षापासून फरार असलेल्या गंभीर स्वरूपाचे गुन्हातील आरोपी सन्मान बाबासाहेब मापारी यास ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई कल्याणी पाडोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे, पुणे, पो शि 8146 बडगे, पो शि 8112 भांगले, पो शी 8250 तरंगे यांनी केली.
आरोपी सन्मान बाबासाहेब मापारी यास पोलिसांनी अटक करून उदयीक रोजी न्यायालया समक्ष रिमांड रिपोर्टासह हजर केले. सदर आरोपीचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळलेला आहे. कल्याणी पाडोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे, पुणे