पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
पुणे :- पोलीस आयुक्तालयात दिवसेंदिवस शरीरविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यामध्ये पाहिजे/फरारी, तडीपार गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार सो व मा.सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक सो. यांनी पाहिजे/ फरार, तडीपार आरोपीविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने Unit-2 कडील API वैशाली भोसले व स्टाफ Unit-2 हद्दीत पेट्रोलिंग करून पाहिजे/ फरार, तडीपार, आरोपीचा शोध घेत असताना HC उज्वल मोकाशी व HC संजय जाधव याना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ व मार्केटयार्ड पो.स्टे. कडील जबरी चोरी व घरफोडीच्या एकूण 4 गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सचिन बोकेफोडे रा. कात्रज हा मस्तान हॉटेल, कात्रज येथे थांबलेला आहे. सदरबाबत Unit-2 प्रभारी मा.पो.नि. क्रांतिकुमार पाटील सो याना अवगत केले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वरील स्टाफने बातमी ठिकाणी जाऊन प्राप्त वर्णनावरून सचिन गोपी बोकेफोडे वय- 19, रा. स न 12, सुंदरनगर, मांगडेवाडी कात्रज पुणे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे दाखल गुन्ह्या अनुषंगाने चौकशी करता तो प्रथम असंबंध माहिती देऊ लागला. त्यानंतर त्यास Unit-2 कार्यालयात आणून कसून चौकशी करता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. सदरबाबत भारती विद्यापीठ व मार्केटयार्ड पो स्टे कडे चौकशी करता तो खलील गुन्ह्यात पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
(1) भारती विद्यापीठ CR No 469/22 IPC 380
(2) मार्केटयार्ड CR No 47/22 IPC 392
(3) मार्केटयार्ड CR No 92/22 IPC 379
(4) मार्केटयार्ड CR No 111/22 IPC 380
त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील अधिक तपासकामी *भारती विद्यापीठ पो.स्टे.* च्या ताब्यात देण्यात आले आहे.
तडीपार इसमाचा पूर्वेतिहास :- सचिन गोपी बोकेफोडे वय- 19, रा. स न 12, सुंदरनगर, मांगडेवाडी कात्रज पुणे हा भारती विद्यापीठ व मार्केटयार्ड पो स्टे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांचेवर मालमत्ते विरुद्धचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, API विशाल मोहिते, पोलीस अंमलदार मोहसीन शेख, संजय जाधव, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, निखिल जाधव, उत्तम तारू, गजानन सोनुने, गणेश थोरात, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, कादिर शेख, समीर पटेल, नागनाथ राख या टीमने केलेली आहे.*