✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.1:- वर्धा येथे दि.3 ते 5 फेब्रुवारी या कालावधित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनामध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणावर साहित्यिकांसह नागरिकांची उपस्थिती असणार आहे. यासाठी वर्धा शहर सुंदर, स्वच्छ असावे, यासाठी आज संमेलन परिसर व शहरातील विविध भागात नगर परिषद व स्वयंसेवी संघटनाच्यावतीने श्रमदान करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानामध्ये माजी नगर परिषद सदस्य, नगर परिषदेचे संबंधित अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आयोजन समिती व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महात्मा गांधी पुतळा, बाबासाहेब आंबेडकर ते झाशी राणी चौक, पोस्ट ऑफिस. झाशी राणी चौक ते आदिती मेडिकल. आदित्य मेडिकल ते आर्वी नाका चौक. आर्वी नाका, तुकडोजी महाराज चौक, पावडे चौक ते संमेलन स्थळ. गव्हर्नमेंट शासकीय रुग्णालय शासकीय ग्रंथालय बस स्टँड, रेल्वे स्थानक मुख्य परिसर. आर्वी नाका व महात्मा गांधीजी पुतळा ते सेवाग्राम रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता मोहिमेसाठी वेगवेगळ्या परिसरांची जबाबदारी वेगवेगळ्या सामाजिक संघटना व संमेलन आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. मुख्याधिकारी राजेश भगत यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी देखील शहराच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
सहभाग झालेल्या संघटनांमध्ये निसर्ग सेवा समिती, बहार नेचर फाउंडेशन, पतंजली योग समिती, जनहित मंच, माजी सैनिक संघटना, प्रहार समाज जागृती संस्था, जेष्ठ नागरिक आधारवड संघटना, वैद्यकीय जनजागृती मंच, निमा संघटना, वर्धा सोशल फोरम, रोटरी क्लब ऑफ गांधी सिटी लायन्स क्लब, वर्धा फ्लागर्स, सेवानिवृत्त इंजिनिअर, पब्लिक रिलेशन्स सोसाइटी आफ इंडिया सहभागी झाल्या होत्या.