पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होणा-या चोरीच्या गुन्हयास प्रतिबंध होणेकरीता वेगवेगळ्या खाजगी दुचाकीवरून तपास पथकातील अधिकारी अनिल सुरवसे, पो. हवा. २८३ अमोल हिरवे, पो.हवा, ३७६८ महेश वाघमारे, पो.शि. ८४४२ गणेश चिंचकर, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी पो.शि. १००७५ राहुल रासगे, पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. ९१२६ विकास मरगळे, पो.शि. ९००२६ राहुल धोरात असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांच्या सुचनाप्रमाणे पैट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व राहुल थोरात यांना बिसमिला हॉल, साईबाबानगर येथे स्लेंडर मोटार सायकल क्र.एम.एच.१४ के. आर. ७७५८ हीचे वरुन पठाणी कपडे घातलेला इसमा कडील मोटार सायकल वरिल नंबर हा संशयीत वाटल्याने सदर इसमाच्या मागे जावुन त्यास गाडी थांबविण्यास सांगितली असता सदर इसम यास पोलीसांचा संशय आल्याने तो गाड़ी न थांबविता तसाच पुढे जावु लागला. त्यास सोबतच्या स्टाफच्या मदतीने थोडयाशा अंतरावर पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव मोहम्मद हनीफ चाँद शेख, वय ५२ वर्षे रा. साईबाबानगर, लेन नं. ०८, आबु हनिफ बिल्डींग, दुसरा मजला, कोंढवा खुर्द पुणे असे असल्याचे सांगितले. तसेच सोमजी चौकाजवळील फायरब्रिगेड ऑफिसच्या समोर ही एच.एफ. डिलक्स मोटार सायकल क्र.एम.एच.१६. के. ई. ९५४४ डीवे वरुन मिलेट्री रंगाचा टिशर्ट घातलेला इसम जात असताना दिसला. सदर इसमाकडील मोटार सायकल वरिल नंबर हा संशयीत वाटल्याने त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव गणेश रामदास भोर, वय २८ वर्षे, रा. स.न. १५ अल्हाबाद बँकेच्या समोर कामठे कॉम्प्लेक्स महादेवनगर, हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले.
नमुद इसमांना विचारपुस करून कागदपत्राची मागणी केली असता गाडीची कागदपत्र मित्राकडे आहेत. ती सापडत नाही अशी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागले. सदर इसमाच्या तात्न्यात मिळुन आलेल्या मोटार सायकलच्या मालकांचा अगर तिच्याबाबत दाखल असणा-या गुन्हयाबाबतचा शोध घेणे
आवश्यक असल्याने सदर इसमांस ताब्यात घेण्यात आले होते.
सदर इसमाकडे मिळुन आलेल्या गाडयाबाबत सखोल तपास केला सदर मो.सा. या आरोपी मोहम्मद हनीफ चाँद शेख याने मामलेदार कचेरी खडक येथुन चोरी केल्याचे व गणेश रामदास भोर याने अ.नगर येथून मो.सा. चोरी केल्याचे कबुल केले असुन त्यावर बनावट नंबर टाकला असल्याचे सांगितले. सदर आरोपी यांच्याकडे अधिक काही मो.सा. चोरीचे गुन्हे केले आहेत का? याबाबत तपास केला असता त्याच्याकडुन पुढीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहे.मोहम्मद हनीफ चाँद शेख याने केलेले गुन्हे :- १) खडक पोलीस ठाणे गु.र.न. ४७/२०२३ भादवि कलम ३७९ २) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ८७५/२०२२ भादवि कलम ३७९ गणेश रामदास मोर याने केलेले गुन्हे :- १) तोफखाना पोलीस ठाणे गु.र.न. २४५ / २०२१ भादवि कलम ३७९२) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. १०७५/२०२१ भादवि कलम ३७९
सदर कामगिरीबाबत मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.