पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
दिनांक ३०/०१/२०२३ रोजी पंडीत जवारहलाल नेहरू उदयोग केंद्र येरवडा (बाल सुधारगृह) येथून पळुन गेलेल्या विधीसंघर्षित बालकांचा शोध घेवून, त्यांना परत बालसुधारगृहात जमा करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांचे आदेश झालेले होते..
त्याप्रमाणे युनिट-२ चे प्रभारी श्री क्रांतीकुमार पाटील यांनी त्यांचे पथकातील सहा. पो. निरी.. वैशाली भोसले व पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे दिनाक ०२/०२/२०२३ रोजी पोलीस अंमलदार, नामदेव रेणुसे यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे सिंहगड रोड नादेड फाटा येथुन ०२ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असुन त्यांची ससुन हॉस्पीटल येथे वैदयकिय तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकामी येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्र.८८/२०२३ भा.द.वि.क. ३६३ मध्ये ताब्यात देण्यात आलेले आहे.. अधिक तपास येरवडा पोलीस स्टेशन येथे चालु आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्री. अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री. सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार, नामदेव रेणुसे, उत्तम तारु, प्रमोद कोकणे, गणेश थोरात व नागनाथ राख या पथकाने केली आहे.