Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

शिवाजीनगर पोलीसांकडून अवैद्य गुटखा विक्रीवर कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 4, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
शिवाजीनगर पोलीसांकडून अवैद्य गुटखा विक्रीवर कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

दिनांक ०३/०२/२०२३ रोजी सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे त्यांचे स्टाफसह शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मा. वरीष्ठ अधिकारी यांनी अवैध गुटखा विक्री, साठा, वाहतुक करणा-या इसमांवर प्रतिबंध घालण्याचे अनुषंगाने तसेच कारवाईच्या अनुषंगाने आदेशित केलेने त्याअनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार रणजित फडतरे यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, ज्ञानेश्वर पादुका चौक, एफ सी रोड, शिवाजीनगर पुणे येथे रात्री २२/०० वाजणेचे सुमारास एक पांढ-या रंगाचा छोटा हत्ती टेम्पो त्याचा आर टी ओ क्रमांक एम एच १२ एफ
डी ८३४९ हा टेम्पो गाडीमध्ये गुटखा घेवुन वाहतुकीकरीता येत आहे. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविली असता, त्यांनी सदर
ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यानंतर तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे स्टाफसह ज्ञानेश्वर पादुका चौक, एफ सी रोड, शिवाजीनगर पुणे येथे रवाना होवुन तेथे सापळा रचुन सदर ठिकाणी वरील वर्णनाचा टेम्पो मिळुन आलेनंतर टेम्पोचालकास त्याचे ताब्यातील टेम्पोसह ताब्यात
घेवून, विश्वसात घेवून माहीती घेतली असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर दादासाहेब जगताप वय २८ वर्ष राहणार वडारवस्ती, लेन नंबर ७ साईबाबा मंदिराजवळ, कर्वेनगर पणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी

करता त्याने टेम्पोमध्ये प्रतिबंधीत गुटखा हा विक्रीकरीता घेवुन जात असलेचे सांगितले. टेम्पोचालक इसम नामे ज्ञानेश्वर दादासाहेब जगताप वय २८ वर्ष राहणार वडारवस्ती, लेन नंबर ७, साईबाबा मंदिराजवळ, कर्वेनगर पुणे याने महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी त्यांचे प्रतिबंधीत आदेश क्रमांक असुमाका/ अधिसुचना / ५२४ / ०७ दिनांक १५/०७/२०२२ नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला किंवा अंतिमतः गुटखा किंवा पान मसाला गठीत होऊ शकेल असा पदार्थ सुगंधीत किंवा स्वादीष्ठ सुपारी / तंबाखू इत्यादीचे उत्पादन / साठा/ वितरण / वाहतुक तसेच विक्री यावर बंदी घातली आहे. त्यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केले आहे व विनापरवाना प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करण्याचे उद्देशाने दिनांक ०३/०२ / २०२३ रोजी रात्री २२/०० वाजण्याचे सुमारास ज्ञानेश्वर पादुका चौक, एफ सी रोड, शिवाजीनगर पुणे येथे वाहतुक करताना मिळून आला आहे. सदर प्रतिबंधीत साठा हा जनआरोग्याचे दृष्टीने असुरक्षित असल्याने विक्री, वाहतुक साठा उत्पादन, वितरण याकरीता प्रतिबंधीत केलेला आहे. कारण सदर प्रतिबंधीत पदार्थ सेवन केल्यामुळे मुखाचा कर्करोग, ओरल सबम्युकस फायब्रोसीस गुणसुत्रातील विलाग्र इत्यादी शारीरीक हानी होत असल्याने वरील नमुद इसम याचेविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३४/२०२३ भा.दं.वि. कलम १८८. २७२, २७३ ३२८ व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ). ३१ २६ (२) (1) २६ (२) (IV) अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन ॲन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २.३.४ चे उल्लंघन केले आहे. तसेच सह वाचन ३ (1) ZZ चे उल्लंघन केल्याने ५९ नुसार गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.

सदर आरोपीकडुन दाखल गुन्हयाचे पुरावेकामी ३८,८९६/- रुपये किं चा प्रतिबंधीत विमल पान मसाला गुटखा आणि २,५०,०००/- रुपये किंचा एक छोटा हत्ती टेम्पो त्याचा आर टी ओ क्रमांक एम एच १२ एफ डी ८३४९ असा एकुण २.८८.८९६/- किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. सन्दीपसिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि०१, पुणे शहर, मा. नारायण शिरगावकर, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, बशीर सय्यद, गणपत वाळकोळी, अविनाश भिवरे, प्रविण राजपुत, अतुल साठे यांनी केलेली आहे.

Previous Post

अंतोरा गावातील बौध्द धर्माचा पंचशील ध्वजाची विटंबना प्रकरण, अखेर जिल्हा प्रशासनाकडून समस्त बौद्ध बांधवांना मिळाला न्याय.

Next Post

दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी गाईंना इंन्जेक्शन देवुन त्यांना बेशुदध करुन त्यांची कत्तल करुन घेवुन जाणाऱ्या टोळीच्या ०६ आरोपींना अटक करुन एकुण २५,२०,९८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन एकुण १३ गुन्हे उघड केलेबाबत…..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी गाईंना इंन्जेक्शन देवुन त्यांना बेशुदध करुन त्यांची कत्तल करुन घेवुन जाणाऱ्या टोळीच्या ०६ आरोपींना अटक करुन एकुण २५,२०,९८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन एकुण १३ गुन्हे उघड केलेबाबत…..

दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी गाईंना इंन्जेक्शन देवुन त्यांना बेशुदध करुन त्यांची कत्तल करुन घेवुन जाणाऱ्या टोळीच्या ०६ आरोपींना अटक करुन एकुण २५,२०,९८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन एकुण १३ गुन्हे उघड केलेबाबत…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In