मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाययोजनाची केली जनजागृती
संतोश मेश्राम चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 2 फेब्रु:- राजुरा येथे दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, नाणीजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या पादूका दर्शन सोहळ्याचे आयोजन राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विदयालय राजुराच्या भव्य पटांगणावर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ, राजुरा च्या वतीने करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण या आध्यात्मिक आयोजनात सहभागी झाले होते. याच ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांकरिता मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. राजुरा तालुका संघटिका अल्का गंगशेट्टीवार व राजुरा तालुका उपाध्यक्ष मोहनदास मेश्राम यांच्या मार्गदर्शनात या पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाय योजनांचे सुद्धा फ्लेक्स च्या माध्यमातून माहितीफलक लावून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष बादल बेले, वन्यजीव संवर्धन समितीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संदीप आदे, स्वप्नील म्यॅकलवार, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय या शाळेतील विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते.
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ, राजुरा व चंद्रपूर जिल्हा च्या वतीने यावेळी मोठ्या स्व-स्वरूप संपद्राय माणसाला माणुस बनविण्याची कार्यशाळा आयोजित कारण्यात आली होती. भक्तीमुळे माणसामध्ये सकारात्मक बदल होतात. संयम, चिकाटी, जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता, समयसुचकता, नेतृत्व गुण, दुरदृष्टीकोन असे अनेक गुण विकसीत होतात. यासाठी हा संप्रदाय कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. राजुरा नगरीतून श्रीं च्या पादुकांचे भव्य मिरवणुकीने आगमन, सामाजिक उपक्रम, गुरूपुजन, आरती सोहळा, प्रवचन, भक्त दिक्षा, दर्शन आणि पृष्पवृष्टी असे विविध उपक्रम, कार्यक्रमाचे स्वरूप होते. तर सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोफत शिलाई मशिन आणि गरजुंना फवारणी पंपाचे वाटपही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ, राजुरा व चंद्रपूर जिल्हाच्या वतीने करण्यात आले.