नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मागील काही दिवसांपासून राज्यात थोर पुरुषांबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. दरम्यान, मागील अनेक प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगेस चे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आज भारतीय जनता युवा मोर्चा मीरा भाईंदर जिल्ह्याच्या वतीने माजी मंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आवाड यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकारी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी, माफी न मागितल्यास युवा मोर्चा टीमसह युवा अध्यक्ष पंकज पांडे आणि संपूर्ण भारतीय जनता पक्ष या विरोधात आणि आक्रमकपणे आंदोलन करत राहणार.
यावेळी भाजप मीरा भाईंदर जिल्हा सरचिटणीस अनिल भोसले, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य चंद्रकांत मोदी, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील राणा यांच्या सह शेकडो भाजपा कार्यकर्ते आजच्या आंदोलनात सहभाग घेऊन आपली निराशा दर्शवली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348