पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईनपुणे :- मार्केटयार्ड पोलीस ठाणे गुरनं १७३/२०२२. भा. द. वि. कलम ३९५.३९७, १२०(ब) मोक्का कलम ३ (१) (ii)३ २ ) ३ (४) मधील पोलीस कस्टडीतील आरोपी नामे संतोष बाळु पवार, वय २३ वर्षे, रा. खानापुर यावेवर मोका कायदा अंर्तगत गुन्हा दाखल असुन त्यास त्याचे साथीदारांसह तपासकामी येरवडा कारागृहातुन दि. २४/०१/२०२३ रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची मा. न्यायालयाने दि. ०३/०२/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली होती. दि.०१/०२/२०२३ रोजी आरोपी संतोष बाळु पवार व साई राजेंद्र कुंभार, रा. खानापुर यांना तपासकामी लॉकअप मधुन काढुन, त्यांचे राहते घरी घरझडती करावयाची असल्याने खानापुर येथे आरोपी साई कुंभार याचे राहते घरी घेवुन गेले असता, तो तपासात सहकार्य करणारे अधिकारी कर्मचारी यांना मारहाण करून, त्याचे तीन साथीदाराच्या मदतीने पळुन गेला म्हणुन हवेली पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गु.र.नं.४२ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७,३५३. ३३२,२२४, २२५,३४ अशा गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ-०५ श्री. विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे, श्री. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती.. अनघा देशपांडे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती सविता ढमढेरे मार्केटयार्ड पोलीस ठाणे व तपास पथकाचे प्रभारी अधिकारी मदन कांबळे, पोउपनि शिंदे, पोलीस अंमलदार जाधव, जाधव, मोधे, यादव, लोणकर, गायकवाड तसेच बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि काळुखे, पोलीस अंमलदार, जाधव, पाटील, येवले, मोरे, घुमाळ, कोंढवा पोलस स्टेशनचे सपोनि. सुरवसे व पोलीस अंमलदार, होळकर, थोरात व वानवडी पोलीस ठाणे सपोनि जाधव, पोउपनि मोसले व पोलीस अंमलदार, सुतार, गायकवाड, चोरमले यांची वेग-वेगळी तपास पथके तयार करुन त्यांनी पलायन केलेले पोलीस कस्टडीतील आरोपी संतोष बाळु पवार याचा पुणे जिल्हा परीसरात दिवस रात्र पाळत ठेवून असताना यातील आरोपी संतोष बाळु पवार हा टेंभुर्णी, जि. सोलापुर येथे असल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने तेथील टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे स्थानिक अधिकारी व अंमलदार यांची मदत घेवुन आरोपी संतोष बाळु पवार यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. रितेशकुर, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांचे सुचनेनुसार मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ०५. पुणे, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे, श्रीमती पौणिर्मा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनघा देशपांडे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली असुन, आरोपी संतोष बाळु पवार यास अटक केली आहे..