सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपुर:-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन तमाम महाराष्ट्राच्या शिवभक्ततांची मने व भावना दुखावल्या गेल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची माफी मांगवी अन्यथा बाळासाहेबांची शिवसेना व युवासेना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने शिवसेना पक्षाचे पुर्व विदर्भाचे नेते किरण पांडव, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारी सदस्य हर्षल शिंदे, चंद्रपूर सहसंपर्क प्रमुख बंडु हजारे, चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या आदेशानुसार युवासेना जिल्हा प्रमुख सुर्या अडबाले व चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथे आ.जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोड़े मारुन व दहन करुन जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी अरविंद धीमान जिल्हाप्रमुख,वाहतुक सेना,विशाल जी कावणे उपशहरप्रमुख,अविनाश जी उके उपजिल्हाप्रमुख वाहतुक सेना,जिंतेन्द्र सोमनकर,युवासेना सदस्य राहुल मेश्राम, अविनाश कोडमलवार,प्रफुल श्रीरामे, तालीप खान पठाण, ययुब शेख, वैभव भेंडारकर, प्रवीन मडावी, पार्थ सिडाम, स्वप्नील सोनवने, समीर शामकुळे,शिवसेना युवासेना व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते…

