नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- दिनांक 07 फेब्रुवारी 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका कर विभागीय आढावा बैठक मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (कर विभाग) संजय शिंदे, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, सहाय्यक आयुक्त (कर) चंद्रकांत बोरसे, कर वसुलीसाठी प्रभागनिहाय नेमणूक करण्यात आलेले अधिकारी, सिस्टम मॅनेजर, कर निरीक्षक, कर वसुली लिपिक उपस्थित होते. मोठे थकबाकीदार असलेली कर वसुली लवकरात लवकर कशी होईल व महानगर पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्या या अनुषंगाने ही आढावा बैठक घेण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348