Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

“वॉक विथ कमिशनर” संकल्पनेतून मा. आयुक्त यांनी प्रभाग समिती क्रमांक 6 कार्यालय ते काशिगाव याठिकाणी केला पाहणी दौरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
“वॉक विथ कमिशनर” संकल्पनेतून मा. आयुक्त यांनी प्रभाग समिती क्रमांक 6 कार्यालय ते काशिगाव याठिकाणी केला पाहणी दौरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील साफसफाई बाबत, उद्यानाबाबत प्राप्त तक्रारी, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावर अनधिकृतरित्या बसणारे फेरीवाले या नागरिकांच्या सततच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात ठेवून आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी दिनांक 08 फेब्रुवारी 2023 रोजी “वॉक विथ कमिशनर” या संकल्पनेतून सकाळी 8.30 वाजल्यापासून प्रभाग समिती क्रमांक 6 कार्यालय ते काशिगाव या परिसराचा पाहणी दौरा केला.

सदर पाहणी दरम्यान मा. आयुक्त यांनी नीलकमल नाका, जनता नगर, मांडवी पाडा, ग्रीन व्हिलेज, काशीगाव मार्केट परिसर याठिकाणी फुटपाथवरील टपऱ्या, अनधिकृत शेड, बेवारस वाहने, फेरीवाले, अनधिकृतरीत्या विजेच्या पोलवर लावण्यात आलेले बॅनर, रस्त्याच्या कडेला तसेच फूटपाथ व दुकानासमोर ठेवण्यात येणाऱ्या कुंड्या यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागास दिले. फूटपाथ व रस्त्यांवर काही ठिकाणी गटारांची तुटलेली झाकणे ही नव्याने बसविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना देण्यात आले. तसेच रस्त्यापासून ते फूटपाथपर्यंत डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी साफसफाई ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ढीग उचलून नियमित ते स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या, खाद्यविक्रेते यांच्याकडून अस्वच्छता पसरत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मा. आयुक्त यांनी स्वच्छता निरीक्षकास दिले.

पाहणी दरम्यान मा. आयुक्त यांची स्थानिकांनी भेट घेत त्यांच्या परिसरातील अतिक्रमण, अस्वच्छता, फेरीवाल्यांच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. त्याअनुषंगाने मा. आयुक्त यांनी पाहणी दौरा हा फक्त सिमीत भागात नसून संपूर्ण शहरात होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शहरातील सर्व नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निवारण केले जाईल असे मत आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी व्यक्त केले.

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या भोवती लावण्यात आलेल्या कुंपणात कचरा टाकण्यात येतो तो साफ करून कचरा टाकताना आढळणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही ठिकाणी झाडांचे कुंपण हे मोडकळीस आले आहेत ते तातडीने बदलून घेण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर मा. आयुक्त यांनी काशी शाळा क्रमांक 4 परिसराची पाहणी करून शाळेत नियमित स्वच्छता राखण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळेभोवती लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखून आणखी नवीन प्रकारची फुलझाडे परिसरात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, शहर अभियंता दिपक खांबित, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सावनेर येथे श्री. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.

Next Post

ज्येष्ठ समाजसेवक व निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
ज्येष्ठ समाजसेवक व निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

ज्येष्ठ समाजसेवक व निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In