Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नागपुर: दीक्षाभूमीच्या विकासकामांसाठी 190 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 9, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर: दीक्षाभूमीच्या विकासकामांसाठी 190 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
मो. न. 9527526914

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परीपर्शाने पावन झाल्याने करोडो बौध्द बांधवांच्या पवित्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दलितांना दीक्षा दिलेल्या त्या दीक्षाभूमीच्या विकासकामांसाठी 190 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) ने दिली.

राज्यशासनाच्या उच्चस्तरीय समितीने याबाबत 10 जानेवारी रोजी बैठक घेत हा निर्णय घेतला. या बैठकीमध्ये न्यायालयाने या दोन्ही विभागांना यावर तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे दीक्षाभूमीचे नाव संपूर्ण जगभरात पोहोचले आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देश-विदेशातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. मात्र, अनुयायांची होणारी गर्दी व त्या तुलनेत प्राथमिक सुविधांचा अभाव लक्षात घेता लोकांची चांगलीच गैरसोय होते.

विशेष म्हणजे, दीक्षाभूमीला ‘अ’ पर्यटनाचा दर्जा आहे. त्यामुळे शेगाव देवस्थानाच्या धर्तीवर विकास आराखडा तयार करून धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, आरोग्य सुविधा व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

दीक्षाभूमीचा दोन टप्प्यात विकास करण्यात येणार असून यासाठी राज्य सरकारकडे विकास निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार 190 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याचे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्ते अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी स्वतः बाजू मांडली.

Previous Post

कोत्तापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन, सांघिक खेळाचे महत्व अनन्यसाधारण: भाग्यश्री ताई आत्राम

Next Post

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई..टोळी प्रमुख सौरभ सुनिल पवार व त्याचे इतर ०२ साथीदार यांचेविरूध्द मकोका कारवाई

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई..टोळी प्रमुख सौरभ सुनिल पवार व त्याचे इतर ०२ साथीदार यांचेविरूध्द मकोका कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In