Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

खर्चाचा हिशोब सादर न करणारे 32 उमेदवार अपात्र जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश ग्रामपंचायत निवडणूकीतील उमेदवार पाच वर्ष निवडणूक लढविता येणार नाही

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 10, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ
0 0
0
खर्चाचा हिशोब सादर न करणारे 32 उमेदवार अपात्र जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश ग्रामपंचायत निवडणूकीतील उमेदवार पाच वर्ष निवडणूक लढविता येणार नाही
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.१०: जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा खर्च उमेदवारांना 30 दिवसांच्या आत संबंधित तहसिलदारांकडे सादर करणे आवश्यक होते. परंतु मुदतीत खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील निवडणूक लढविलेल्या 32 उमेदवारांना ग्रामपंचायत सरपंच व सदस्य म्हणून राहण्यास व पुढील पाच वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबतचा आदेश आज निर्गमित केला.

वर्धा जिल्ह्यात दि.16 ऑक्टोंबर रोजी काही ग्राम पंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीचा निकाल घोषित झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक होते. परंतु उमेदवारांनी हिशोब सादर न केल्याने त्यांना नोटीस देऊन 15 दिवसाच्या आत हिशोब सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वर्धा तालुक्यातील बोरगाव (ना) येथील 6, सालोड(हि) येथील 2 अशा 8 सदस्यांनीच आपले लेखी म्हणणे सादर केले होते.

या नोटीस नंतरही आपले खर्चाचे हिशोब अनेक उमेदवारांनी सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निवडणूक आयोगाचे आदेश व मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील निवडणूक लढविलेल्या 32 उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायत सदस्य, सरपंच राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष हे उमेदवार निवडणूक लढवू शकणार नाही.
अपात्र ठरविण्यात आलेल्यांमध्ये वर्धा तालुक्यातील सालोड (ही) ग्राम पंचायतीमधील 16 उमेदवारांचा समावेश आहे. याच तालुक्यातील बोरगाव (ना) या ग्रामपंचायतीमधील 6 उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. आर्वी तालुक्यातील मांडला ग्रामपंचायतीतील 2, पिपरी (भुतडा) ग्रामपंचायती मधील 1, मिर्झापूर नेरी ग्रामपंचायतीमधील 3, अहिरवाडा ग्रामपंचायत 1, सर्कसपूर ग्रामपंचायत 2 तर जाम (पू) ग्राम पंचयतीमधील 1 उमेदवाराचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Previous Post

राजुरा येथील इन्फंट कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांची ॲक्सिस बँकेला भेट.

Next Post

मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनवर थांबा नाही, खा. राजन विचारे यांचे रेल्वेमंत्री व मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनवर थांबा नाही, खा. राजन विचारे यांचे रेल्वेमंत्री व मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र.

मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनवर थांबा नाही, खा. राजन विचारे यांचे रेल्वेमंत्री व मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In