अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे 7/1/2023 रोजी चेलका गावातील गरोदर माता उषा मनोहर इंगळे प्रसुती करीता आणले असता त्या ठीकाणी गरोदर मातेस उपचार मिळाले नसल्याने परस्पर बार्शिटाकळी येथे घेऊन जावे लागले त्या दरम्यान रुग्णवाहिकेतच महीलेची प्रसुती झाली व वेळेवर उपचार मिळू न शकल्याने बाळाचा मृत्यू झाला या घटनेस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेवर करण्यासाठी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ असोले यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती.
परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मुख्यतः जे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख हे अनुपस्थित असतांनाही त्यांच्या वर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही सदर वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख यांना पाठीशी घालण्याचे काय कारण असावे,हे प्रकरण जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मॅनेज तर केलं नाही ना अशा संशय मृत्यू झालेल्या बाळाचे वडिल मनोहर इंगळे यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या जवळ बोलुन दाखवले म्हणून सदर प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथिल डॉ अमित देशमुख यांच्या विरोधात मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी पिडित मनोहर इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

