Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

“होय, आम्ही ‘शूद्र’ आहोत” ‘हिंदी पट्ट्यातून ओबीसींचा एकमुखी आवाज’.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 11, 2023
in नागपुर, महाराष्ट्र, विदर्भ, साहित्य /कविता
0 0
0
“होय, आम्ही ‘शूद्र’ आहोत” ‘हिंदी पट्ट्यातून ओबीसींचा एकमुखी आवाज’.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखक :- रणजित मेश्राम, नागपुर ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन साहित्य:- चातुर्वर्ण्यातील ‘शूद्र’ आपणच असल्याची स्पष्ट जाण ओबीसींना आलीय. हीच जाण, हिंदी पट्ट्यात राजकारणात उतरलीय. हिंदुत्वाच्या ध्रुवीकरणाला हा काटशह म्हणता येईल. संघ-भाजपची झोप उडालीय. ‘शूद्र’ राजकारणाने यूपी-बिहार ढवळून निघाले आहे.

कुठून आलं हे ‘शूद्र’ असे झालेय. राजकीय हवा गरम आहे. धर्म मैदानावर (पीच) असे होईल वाटले नव्हते. आपले मैदान असतांना धक्का ? धक्का मोठा आहे. सरसंघचालक हबकून गेले. जातींना ईश्वराने नव्हे, पंडितांनी (ब्राह्मणांनी) निर्माण केल्याचे बोलून गेले. जाणीवपूर्वक बोलले असतील तरी अडकले ! आता संघाचे अ.भार. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, इंडियन एक्सप्रेस ला स्पष्ट करताना म्हणाले, सरसंघचालक मराठीत बोलले. मराठीत पंडितचा अर्थ होतो ‘बुध्दिवादी’

निमित्त, तुलसीदासकृत रामचरित मानस मधील, “ढोल, गंवार, शूद्र, पशू, नारी .. सब है ताडन के अधिकारी” चौपाई (पद) आहे. ताडन म्हणजे शीक्षा-दंड !

बिहारचे शिक्षा मंत्री चंद्रशेखर राय यांनी ही बाब उचलली. सपा नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी उत्तरप्रदेशात पोचती केली. आता दोन्ही राज्ये यात लपेटली आहेत. विशेष म्हणजे दोघांनाही त्यांच्या पक्षप्रमुखांनी (तेजस्वी यादव- अखिलेश यादव) अभय दिले. तेजस्वी आधीच खुलून बोलत होते. आता अखिलेश खुलले. स्वामीप्रसादांची पदोन्नती झाली. राष्ट्रीय सरचिटणीस झाले. शिवाय यूपी ओबीसी जनगणना आंदोलनाचे नेते घोषित करण्यात आले. बिहारात ओबीसी जनगणना सुरू झालीय.

अलीकडे, सपाने लखनौ मुख्यालयासमोर भलेमोठे ‘होल्डिंग’ लावले. लिहिले आहे, “गर्व से कहो हम ‘शूद्र’ है”. अखिलेश यादव यांनी, ‘हां, हम शूद्र है’ असे पत्रकारांना सांगून टाकले. परत त्यांनी मुख्यमंत्री योगी यांना विचारले की, आपण पीठाधीश आहात. म्हणून ‘त्या’ चौपाईचा अर्थ सांगावा. योगी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत देतांना म्हणाले, त्या चौपाईचा अर्थ त्यांना कळणार नाही. ते ‘नासमज’ आहेत.

दोन्ही, टीव्ही व मोबाईल मिडियात यावर सडकून चर्चा आहे. काही म्हणतात, पंडित म्हणजे ज्ञाता-जाणकार. काही म्हणतात, चौपाईत शूद्र नव्हे ‘क्षुद्र’ लिहिले होते. काही म्हणतात, एकच चौपाई कां, अनेक चौपाईत आक्षेपार्ह लिहिले आहे. वाद मिटण्याचे नाव घेत नाही. आता तर तुलसी किंवा तुलसीदास न म्हणता, तुलसीदास दुबे म्हणतात. भरीसभर, ओबीसींची ठिकठिकाणी संम्मेलने होऊन आक्रमक भाषणे केली जात आहेत.

यात अडचण संघ-भाजपची झालीय. चौपाई विचारणाऱ्यांवर शंका घेता येत नाही. ते सारे हिंदू आहेत. पाकिस्तानात जा असे सांगता येत नाही. राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही ठरविता येत नाही. अशी अडचण झालीय. सपा-आरजेडी मात्र खुष आहे. ओबीसी गोलबंद होतोय. आक्रमक होतोय. स्वतः अखिलेश व तेजस्वी हे ओबीसी आहेतच. हिंदुत्वाची मोठी व्होट बॅंक सरकलीय. राजकीय चिडचिडीला उधाण आले आहे.

बसपा मूक आहे. पाहते आहे. तशीही आधी सारखी पकड नाही. कदाचित ‘ती’ व्होट बँक चौपाईकडे जाण्याची शक्यता बळावलीय. यूपीतील दलित अधिक जागे आहेत मुस्लिमांना भाजप नकोच. धर्माचे राजकारण असा फेर धरेल हे संघ, भाजपला वाटले नव्हते. त्यांची चिडचिड मोठी आहे.

संविधानस्वीकृत देशधोरणे यातून बचावतील म्हणतात. काय व्हायचे ते पूढे अधिक स्पष्ट होईल. २४ चा फेर मात्र २३ ने आताच धरलाय. मध्यप्रदेशही घुसळते आहे. काट्याने काटा काढतात असे झाले की काय ? वैचारिकी मात्र खिन्न आहे !

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

परदेशातुन कापसाची आयात थांबवुन भारतातील शेतकऱ्यांना दिलासा द्या: माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्य उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, आयुष्मान कार्डचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्य उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, आयुष्मान कार्डचे वाटप.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्य उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, आयुष्मान कार्डचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In