पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- परदेशातुन येणाऱ्या कापसाची आयात थांबवुन भारतातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे परदेशातील कापुस आयात करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे भारतातील कापसाचे दर घसरले असुन शेतकरी अंधकारमय चाकोरीतुन वाटचाल करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कापुस आयात करण्याचे धोरण थांबवावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या प्रचंड दबावात टेक्सटाईल, गारमेंटस, खाद्य पदार्थ उत्पादक लॉबीच्या फायदयासाठी सोयाबीन, कापुस पिकांसह सोयाबीन, तांदुळ, गहू,हरभरा,मोहरी,तुर उत्पादनाच्या सौदे बाजरावर बंदी घातली तसेच कापुस परदेशातुन आयात करण्यास परवानगी दिली त्यामुळे शेतमालाच्या किमतीत प्रचंड घसरण झाली असुन कपासाचे भाव पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठया प्रमाणात फटका बसला आहे.
शेतकऱ्यांच्या घरात कापुस आहे परंतु भारत सरकारच्या आयातीच्या धोरणामुळे भाव पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. बाजार पेठेत कापसाची आवक कमी असल्यामुळे जिनिंग प्रेसींगचे कारखाने बंद पडले आहे. केंद्र सरकारने सेबीने स्विकारलेल्या धोरणात्मक नियोजनित सुधारणा करावी. तसेच केंद्र सरकारने कापुस आयातीचे धोरण बंद करून शेतकऱ्यांना दिलासा दयावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348