श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- नगरपालिका प्रशासनासह जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणातून बिंदुसरा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आज शहरातील जुना मोंढा पूल परिसरात ही मोहीम सकाळी सात वाजल्यापासून राबविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी या स्वच्छता मोहिमेसाठी जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर अशी मशिनरी यंत्रणा उपलब्ध करून सहभाग नोंदवला.
शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी स्वच्छता मोहिम प्रसंगी सकाळपासून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, नगरपालिका मुख्याधिकारी निता अंधारे यांच्यासह उपस्थित राहत या मोहिमेत सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी सुरू असलेल्या बिंदुसरा नदी च्या स्वच्छता मोहिमेबद्दल आणि नदी रुंदीकरणाबद्दल जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करत स्वच्छ ता मोहिमेबद्दल माहिती घेतली. तसेच या स्वच्छता मोहिमेत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा नगरपालिका मुख्याधिकारी निता अंधारे यांनी मोहिमेत सामील होऊन स्वच्छतेसाठी उपयोगी मशिनरी साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानले. यावेळी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी मोहिम पूर्ण होईपर्यंत यात सहभागी राहणार असल्याचे सांगितले.
बीड शहरातून जाणाऱ्या सहा किलोमीटर लांबीच्या नदी प्रवाह पैकी साडेतीन किलोमीटर लांबीचा भाग अति प्रदूषित झाला आहे.बिंदुसरा नदी म्हणजे आपल्या चंपावती नगरीला निसर्गाने दिलेली एक सुंदर देन आहे. तिचे संवर्धन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही सुद्धा या कामी सहकार्य करणार असून शहरवासीयांनी देखील या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी पुढे येणे गरजेचे आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, तहसीलदार हजारे, मुख्याधिकारी निता अंधारे यांच्या समवेत मागील सहा आठवड्या पासुन सुरू असलेल्या कामास भेट दिली. यावेळी प्रशासनाने सहकाऱ्यासाठी साद घातल्याने आपण नदी रुंदीकरण व स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य पुरवणार असून यामध्ये जे.सी.बी. पोकलेन, ट्रॅक्टर्स, टिप्पर आदींचा समावेश असल्याचे डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी नागरिकांना आवाहन करताना त्यांनी कचरा नदी पात्रात न टाकता नगर पालिकेच्या घंटा गाडीतच टाकावा. तेव्हाच नदीची कचरा व प्रदूषणातून मुक्तता होऊ शकते. बीड शहरातील अधिकाधिक नागरिक व स्वयंसेवी संस्थानी मोहिमेत देखील सहभागी व्हावे, असे आवाहन देखील डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर केले.
यावेळी गजानन बँकेचे संचालक धनंजय वाघमारे, आमेर सिद्दीकी, उमेश बांगर, विक्रम चव्हाण,ईश्वर धन्वे, पत्रकार नितीन जोगदंड यांच्यासह पालिका, जिल्हा प्रशासन,महसुल यांची यंत्रणा, स्वच्छता विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.