जय माँ मदनागीरी क्रीडा मंडळाकडून टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भामरागड:- तालुक्यातील बासागुडा येथे जय माँ मदनागीरी क्रीडा मंडळाकडून टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी द्वितीय पुरस्कार आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून ठेवण्यात आले होते.
टेनिस बॉल क्रिकेट सामन्याच्या विजयी संघांना द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्यातर्फे आल्लापल्ली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विजयभाऊ कुसनाके यांच्या हस्ते देण्यात आले.
याबक्षीस वितरणाच्या वेळी माजी सरपंच विजय कुसनाके यांचे सोबत पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी जुलेख शेख, सत्तु बाई पुजलवार, येचली सरपंच कमलाबाई कुरसाम, उपसरपंच महेश तंलाडी, ग्राम पंचायतचे सदस्य कुंदारम, गणेश नागपुरवार, संतोष तंलाडी, दशरत बाकडा, मानसाय बाकडा, रैनु तंलाडी, रमेश गावडे, लालसु कुडयामी, समया गावडे, गणेश कुडयामी, मदणया गावडे, संजय येज्जुलवार आदी उपस्थित होते.

