बीड जिल्हा प्रतिनिधी श्याम भूतडा
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- सविस्तर वृत्त असे की, वार्ड क्रमांक -2 मधील बीड शहर पोलिस स्टेशन ते जिजामाता चौक या दरम्यान नगरोत्थान टप्पा क्र-2 अंतर्गत याठिकाणी रस्ता व नालीचे काम प्रगतीपथावर चालू आहे. परंतु येणाऱ्या पावसाळ्यात विशेष करून क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा ठिकाणी नालिची लेवल न काढता नाली बनवल्यास भविष्यात व्यापाऱ्यांना तसेच येथील रहिवाशाना दुकानात आणि घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येनार नाही याचे गांभीर्य पाहून कंत्राटदाराने तातडीने नाल्या करतांना लेव्हल काढूनच पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशा तऱ्हेने बांधकाम करावे, अशी मागणी या प्रभागाचे मा. ज्येष्ठ नगरसेवक विष्णू भैय्या वाघमारे यांनी आपले निवेदन मा. नगरअध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, बीड नगर परिषद चे मुख्यधिकरी निता अंधारे तसेच मा. नगरसेवक योगेश क्षीरसागर यांना निवेदन देऊन हा विषय सोडवण्यात यावे अशी मागणी केली

