Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

बीड: ढोल पथक, कला, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझर शो व ध्वनी प्रदुषण मुक्त अशी डोळ्याचे पारणे फेडणारी शिवजयंती साजरी होणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 14, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड: ढोल पथक, कला, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझर शो व ध्वनी प्रदुषण मुक्त अशी डोळ्याचे पारणे फेडणारी शिवजयंती साजरी होणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विदेशी कलाकार ठरणार मुख्य आकर्षण!
सार्वजनिक शिवजयंतीच्या पदाधिकार्‍यांची पत्रकार परिषदेत माहिती

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- मागील पन्नास वर्षापासून व कोणतीही वर्गणी न घेता अवघ्या महाराष्ट्रभर नावाजल्या गेलेल्या हे शिवजयंती आ.संदीप रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यंदाही बीड शहरामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहरच्यावतीने शिवजयंती निमित्त घेण्यात येणार्‍या ढोल पथक, कला, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझर शो, विदेशी कलाकार आणि ध्वनी प्रदुषण मुक्त अशी डोळ्याचे पारणे फेडणारी शिवजयंती साजरी होणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रमांचे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज) येथे दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत साजरी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष शाहिनाथ परभणे, प्रा.विजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय विश्रामगृह बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना उत्सव समितीच्या वतीने यावर्षी साजरी होणार्‍या विविध कार्यक्रमाची माहिती पुढील प्रमाणे, उत्सव इव्हेंटस,कोल्हापुर हे 23 आंतरराष्ट्रीय शो आणि 76 राष्ट्रीय शोमध्ये भाग घेतला असून सदरील उत्सव इव्हेंटस ऑर्गनायझर गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने बीडचे सार्वजनिक शिवजयंती उत्सवात भारतीय सांस्कृतीत लाभलेली कला सादर करत आहे. तसेच करवीर नाद ढोल ताशा 650 कलाकारांचा गट,150 मुली,400 ढोल,150 ताशा,15 ध्वज,6 खेळणी हे सर्व ढोलकी कलाकार कोल्हापूर, मुंबई, पुणे, ठाणे येथील आहेत. आशिर्वाद लाईट आणि ट्रसिंग गेली 11 वर्षे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादरीकरण केलेले असून अयोध्या येथील लाइट्स आणि लेझर शो 2022 व दुबई फेस्टिवलमध्ये तसेच अरिजित सिंग,बादशाह,नेहा कक्कर,सुनिधी चौहान आणि बॉलीवूड स्टार्सचा लाईव्ह कॉन्सर्टचे देखिल आशिर्वाद लाईट आणि ट्रसिंगने काम केलेले आहे. रमजनी साऊंड दास (स्पेनमध्ये बनवलेली) संगीत प्रणालीमध्ये बॉलिवूड शोमध्ये रमजनी साऊंडसने काम केलेले आहे. वीर खालसा अमृतसर कला ही अमेरिकेच्या गॉट टॅलेंट व अनेक भारतीय शोचा विजेता आहे. भारताबरोबर 11 देशामध्ये कलेचे सादरीकरण केले आहे. केरळमधील शबरी चेंडे नृत्य हे देखिल भारता बाहेर 6 देशांमध्ये कार्यक्रम केलेले आहे. 10 विदेशी फायर आर्टिस्ट युक्रेन, रशिया, मेक्सिको, ऑस्ट्रिया बहुराष्ट्रीय कलाकार हे सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सवामध्ये सादरीकरण करणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शाहिनाथ परभणे, प्रा.विजय पवार यांनी दिली.

यावेळी भाऊसाहेब डावकर, भारत झांबरे, जीवन जोगदंड, सुरेश नखाते. सचिव विशाल तांदळे, सहसचिव गोरख गायकवाड, कोषाध्यक्ष अ‍ॅड.दिपक कुलकर्णी, सहकोषाध्यक्ष कपिल धनकर, सदस्य बबलु तुपे, पवन बहिरवाळ, गुड्डू ढगे, दिघु फाटे, जीवन सुतार, विशाल वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती तर आभार उत्सव समितीचे उपाध्यक्ष शेख वकील सर यांनी मानले.

महापुजेला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची राहणार उपस्थिती
दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी सुर्योदया बरोबर सकाळी 7 वाजता शासकीय महापुजा होणार आहे. या शासकीय महापुजेला बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासह प्रशासनातील अधिकार्‍यांची उपस्थिती राहिल. दरवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते शासकीय महापुजा केली जाते.

शिवप्रेमींना आनंद देणारा हा उत्सव सोहळा-अध्यक्ष शाहिनाथ परभणे
अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या शिव जन्मोत्सव सोहळ्याची आतुरता बीडलाच नव्हे तर महाराष्ट्राला लागलेली असते. या शिवजन्मोत्सव सोहळ्याला महिलांची देखिल लक्षणीय उपस्थिती असते. वर्गणी आणि डिजेमुक्त शिवजयंती उत्सव सोहळा ही संकल्पना आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्षपदी माझी शिवप्रेमींनी निवड केली त्याबद्दल सर्वांचे आभार. आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिव जन्मोत्सव सोहळा देखणा आणि शिवप्रेमींना आनंद देणारा ठरेल. आपल्या सर्वांचे सहकार्य राहू द्या असे प्रतिपादन यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शाहिनाथ परभणे यांनी केले.

Previous Post

मुंबईत IIT पवईत दलीत विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, अजून एक रोहित वेमुला?

Next Post

ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण.

ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In